-
‘बालिका वधू’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (२४) हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमसंबंधांत निर्माण झालेल्या तणावामुळे प्रत्युषाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला आहे.
प्रसिद्ध तामिळ टीव्ही कलाकार साई प्रशांथ याने आपल्या राहत्या घरी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी एक पत्र लिहले असून आपल्या आत्महत्येस कोणीही कारणीभूत नसल्याचे यात म्हटले आहे. -
अभिनेत्री जिया खान हिने तिच्या जुहू येथील अपार्टमेन्टमध्ये ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली. अमिताभ बच्चन यांच्यासह निशब्द चित्रपटात झळकलेल्या जियाने गळफास लावून आत्महत्या केली होती.
-
दिव्या भारती हिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळलेले नाही. दिव्या जेव्हा बालकनीतून पडली तेव्हा ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काहींचे म्हणणे आहेत. तर काहीजणांनी तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याचा मृत्यू झाला.
-
बॉलीवूड अभिनेत्री परवीन बाबी यांचा २००५ साली राहत्या घरी मृतदेह आढळला होता. आपल्या कारकिर्दीत नावलौकिक कमाविणा-या परवीन बाबी या शेवटच्या दिवसांत एकट्या पडल्या होत्या.
-
दिग्गज अभिनेता गुरुदत्त हे राहत्या घरी १० ऑक्टोबर १९६४ रोजी मृत अवस्थेत आढळले होते. गुरुदत्त यांनी मद्यातून झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. त्यापूर्वी त्यांनी दोनदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.
-
एमटीव्ही जॉकी आणि पेशाने मॉडेल असलेल्या नफिसा जोसेफ हिने २९ जुलै २००४ रोजी आत्महत्या केली. विवाहाला काही आठवडेच बाकी असताना तिने आत्महत्येचा मार्ग निवडला.
-
२३ वर्षीय के निरोशा हिने हॉस्टेलच्या रुममध्ये आत्महत्या केली होती. प्रियकरासोबत झालेल्या वादातून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने १९९६ साली गळफास घेऊन आत्महत्या केली.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO