विराटशी असलेल्या जवळीकीमुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावरील जनांच्या सतत निशाण्यावर असते. अनुष्काच्या उपस्थितीत मैदानावरील विराटच्या खराब कामगिरीस लोकांनी तिलाच जबाबदार ठरवत तिची सोशल मीडियावर थट्टा उडवली आहे. याशिवाय विराटशी संबंधित तिच्यावरील अनेक विनोद सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अनुष्काची थट्टा करणारा एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा संदेश वाचून विराट फारच चिडला आणि सोशल मीडियावरील 'त्या' जनांना तारतम्य बाळगण्याबाबत कडक शब्दांत सुनावले. त्याचप्रमाणे अनुष्का आपली प्रेरणा असल्याचेदेखील त्याने म्हटले. अनुष्काव्यतिरिक्त अन्य अभिनेत्री आणि स्त्री अधिकारीदेखील सोशल मीडियाच्या शिकार झाल्या आहेत. केरळमधील पोलीस अधिकारी मरीन जोसेफ काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होती. २०१४ मध्ये मरीन जोसेफने स्वत:चे एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केलं होत. दिसायला सुंदर असलेल्या मरीनचे हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही विकृत मनोवृत्तीच्या जनांकडून या छायाचित्रास खालच्या दर्जाच्या कमेंटस् करण्यात आल्या होत्या. (सौजन्य – फेसबुक) -
'उडता पंजाब'नंतर आलिया आता पुढील चित्रपटासाठी सज्ज झाली असून, त्याची पूर्वतयारीही तिने सुरू केलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फी विथ डॉटर अभियानावर टीका केल्याने अभिनेत्री श्रुती सेठ तब्बल ४८ तास टि्वटरवर ट्रेण्डमध्ये होती. श्रुतीवर टि्वटरकरांनी टीकेची झोड उठवली होती. अभद्र शब्दांचा वापरदेखील करण्यात आला होता. (सौजन्य – फाईल फोटो) दिल्लीतील पोलीस अधिकारी मोनिका भारद्वाज काही दिवसांपूर्वी टि्वटरवर ट्रेण्ड होत होती. भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यानंतर डॉ. नारंगच्या हत्येसंदर्भातले संदेश सोशल मीडियावर फिरत होते. बांगलादेशी घुसखोरांनी ही हत्या केल्याचे या संदेशांमध्ये म्हटले जात होते. यावर मोनिकाने या प्रकरणास जातीय रंग न देण्याचे टि्वटरवरून आवाहन केले होते. यानंतर टि्वटरवर मोनिका भारद्वाजविरुद्ध कमेंट येण्यास सुरुवात झाली. (सौजन्य – फाईल फोटो) तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची अतिरिक्त सचिव बनल्यापासून आयएएस स्मिता सभ्रवाल प्रसिद्धीच्या झोतात आली. सोशल मीडियावरील स्मिताच्या लोकप्रियतेचा इतका परिणाम झाला की एका मासिकाने स्मिताशी संबंधित एक आक्षेपार्ह फोटो प्रसिद्ध केला. यामुळे व्यतिथ झालेल्या स्मिताने सदर मासिकास पाच पानी नोटीस धाडली. टि्वटर आणि फेसबूकवर स्मिताबाबतचे अनेक संदेश पोस्ट करण्यात आले होते. (सौजन्य – फाईल फोटो) -
टि्वटरकरांनी अभिनेत्री सोनम कपूरला मांसाहारावरील बंदी विरुध्दच्या तिच्या टि्वटमुळे निशाण्यावर घेतले होते. (सौजन्य – फाईल फोटो)
मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रिजू बाफनाने मानव अधिकार आयोगाच्या अधिकाऱ्याविरुध्द शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर सोशल मीडियावर तिची छायाचित्रे आणि बातमी व्हायरल होऊ लागली होती. लोकांच्या वाईट वागणुकीमुळे त्रासलेल्या रिजूने सोशल मीडियावर एक खुले पत्र लिहून आपला विरोध दर्शविला. अक्कल नसलेली माणसे पदोपदी भेटत असल्याचं तिने लिहिलं होतं. (सौजन्य – फाईल फोटो) मुंबईतील पावसाळी समस्येवर अभिनेत्री नेहा धुपियाने पाऊस पडताच संपूर्ण मुंबई पाण्याखाली जात असताना सरकार योगा आणि सेल्फीमध्ये व्यस्त असल्याचे टि्वट पोस्ट केले होते. यानंतर टि्वटरकरांनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. या प्रकारानंतर नेहाने टि्वटची संख्या कमी केली आहे. (सौजन्य – फाईल फोटो) २०१४ मध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सौंदर्य प्रसाधनांच्या चाचणीसाठी प्राण्यांच्या वापरावर बंदी आणण्याविषयी मत प्रकट केले होते. यावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एका पाठोपाठ एक टि्वट पोस्ट करत भारतास बॅनिस्तान संबोधले होते. यामुळे संतापलेल्या टि्वटरकरांनी तिचा चांगलाच समाचार घेतला होता. चिडलेल्या सोनाक्षीनेदेखील अनेकांना प्रतीउत्तर दिले होते. (सौजन्य – फाईल फोटो)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार