-
'भारत माता की जय' मुद्द्यावर शिरच्छेदाच्या वक्तव्याने रामदेवबाबा सोशल मीडियाच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर #TalibaniRamdev हा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेण्ड करत आहे. कायद्यामुळे आपले हात बांधले गेले आहेत, अन्यथा अगणित शिरच्छेद केले असते, असे विधान बाबा रामदेव यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे नाव न घेता केले होते. ओवेसी यांनी 'भारत माता की जय' घोषणा देण्यास नकार दिला होता. गळ्यावर सुरी ठेवली तरीदेखील आपण 'भारत माता की जय' म्हणणार नसल्याचे विधान लातूर येथे त्यांनी केले होते.
-
रामदेवबाबा यांचे जिहादी जॉनच्या रुपातील मॉर्फ केलेले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.
-
रोहतकमधील सदभावना यात्रेदरम्यान रामदेवबाबा यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. टोपी घातलेला एक माणूस सांगतो की, काय वाटेल ते करा, पण 'भारत माता की जय' म्हणणार नाही. आम्ही संविधानावर श्रध्दा ठेवत असल्याचे त्या व्यक्तीने लक्षात घ्यायला हवे. कायद्याचा सन्मान करतो, नाहीतर अगणित शिरच्छेद केले असते. अशाप्रकारचे विधान रामदेवबाबा यांनी केले होते.
-
या वक्तव्यामुळे रामदेवबाबा कायद्याच्या पेचातदेखील अडकत चालल्याचे दिसत आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी तक्रार नोंदविण्यात येत आहे.
-
भाजप नेते आणि प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनीदेखील या विधानाची निंदा केली आहे.
-
यूपीए सरकारच्या कार्यकाळात रामदेवबाबा यांनी काळ्या पैशांविरोधात आंदोलन केले होते त्यावेळचे हे छायाचित्र आहे. त्यावेळी ते स्त्री वेषात दृष्टीस पडले होते. हे छायाचित्रदेखील सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
-
विजय मल्याने देशातून पलायन केल्यानंतर आता बाब रामदेव आपल्या ब्रॅण्डची बिअर आणि एअरलाईन्सदेखील सुरू करणार असल्याचे पतंजली ब्रॅण्डचे विनोदी फोटो सोशल मीडियावर फिरत होते.
-
नेस्लेच्या मॅगीभोवती वादाचे वादळ उठल्यानंतर रामदेवबाबा यांनी बाजारात उतरवलेला पतंजली ब्रॅण्डचे आटा नूडल्सदेखील आता वादांनी घेरले आहेत. यावरूनदेखील बाब रामदेव यांची सोशल मीडियावर थट्टा उडविण्यात येत आहे.
-
रामदेवबाबा यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान मोदींचे समर्थ केले होते. यावरूनदेखील टि्वटरकरांनी त्यांना निशाण्यावर घेतले आहे.
-

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार