-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर आता अन्य एक क्रिकेटपटू वडील बनण्याच्या मार्गावर आहे. हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा गर्भवती असल्याची बातमी माध्यमांत झळकत आहे.
-
अद्याप हरभजन आणि गीताकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. आयपीएलच्या उदघाटन कार्यक्रमात गीता हरभजनसोबत दिसली होती.
-
गीताने परिधान केलेल्या पोशाखावरून ती गर्भवती असल्याचे निदर्शनास येते.
-
हरभजन सिंग आणि गीता बसरा आपल्या पहिल्या बाळाची वाट पाहात आहेत.
-
गर्भवती गीता बसरा मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात बाळाच्या वाढीची चिकित्सा करून घेत असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे.
-
गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला हरभजन आणि गीता ही जोडी लग्नबंधनात अडकली.
-
हरभजन आणि गीता बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते. २००७ मध्ये मित्राच्या माध्यमातून दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले. तेव्हापासून ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
आयपीएल उदघाटन कार्यक्रमादरम्यान गीता बसरा.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख