-
भारतीय बाजारातील वाढत्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्पर्धेत स्वत:चे स्थान कायम राखण्यासाठी 'होंडा कार्स इंडिया'ने सात व्यक्तींची आसन क्षमता असलेली कॉम्पॅक्ट 'एसयूव्ही बीआर-व्ही' सादर केली आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ८.७५ ते १२.९ लाख रुपयांदरम्यान आहे.
-
होंडाच्या या गाडीची स्पर्धा बाजारात उपलब्ध असलेल्या हुंदाई क्रेटा (८.४६ लाख रुपये) आणि रेनॉल्ट डस्टर (१४.५ लाख रुपये) या गाड्यांशी आहे.
-
होंडाने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारातील 'एसयूव्ही बीआर-व्ही' बाजारात उतरवली आहे.
-
पेट्रोल प्रकारातील 'एसयूव्ही बीआर-व्ही'ची किंमत ८.७ ते ११.८४ लाख रुपयांदरम्यान आहे. तर डिझेल 'एसयूव्ही बीआर-व्ही' ची किंमत ९.९ ते १२.९ लाख रुपयांदरम्यान आहे.
-
होंडाने 'एसयूव्ही बीआर-व्ही' ऑटो गिअर स्वरुपातदेखील सादर केली असून, या गाडीची दिल्लीतील किंमत ११.९९ लाख रुपये इतकी आहे.
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल