-
मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस मृत्यूसापळ्यांचा मार्ग बनत चालला असून रविवारी पहाटे या मार्गावर पनवेलनजीक झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ प्रवासी जखमी झाले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
गेल्या पाच वर्षांत या मार्गावरील अडीच हजार अपघातांनी ६०० हून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे द्रुतगती मार्गावरील सहा अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाच वेळा स्मरणपत्रे देऊनही त्याकडे संबंधितांनी डोळेझाकच केल्याचे स्पष्ट झाले आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
द्रुतगती मार्गावर पनवेलनजीक शेडुंग गावाजवळ एक खासगी प्रवासी बस स्विफ्ट व इनोव्हा या दोन गाडय़ांवर आदळून रस्त्यालगतच्या खोल खड्डय़ात कोसळली. या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ जण जखमी झाले. जखमींना तातडीने महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक अविनाश कारंडे (३९) यांचा समावेश आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
निखिल ट्रॅव्हल्सचे बसचालक इकबाल शेख याचे शवविच्छेदन करते वेळी शेख हा मद्यपी असल्याची शंका डॉक्टरांना आली. शेख याचा व्हिसेरा मुंबईतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
बचावकार्याला सुरुवात अपघाताची भीषणता लक्षात येताच इनोव्हा चालक आशिष पाटील व त्यांच्या मित्रांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. द्रुतगती मार्गावरून जात असलेल्या टेम्पोचालकाने मदत केली. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
कांदिवली येथे राहणारे अमरजितसिंग शनिदर्शनावरून कुटुंबियांसह घरी परतत असताना त्यांची स्विफ्ट टायर फुटल्याने बंद पडली. द्रुतगती मार्गाच्या पहिल्या मार्गिकेवरच त्यांची गाडी बंद पडल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांना तिचा अडसर ठरत होता. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
घणसोली येथे राहणारे आशिष पाटील व त्यांचे काही मित्र इनोव्हा कारने घरी परतत असताना त्यांनी अमरजित यांच्या मदतीसाठी गाडी द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूला थांबवली. अमरजित यांना टायर बदलण्यासाठी त्यांनी साहित्यही दिले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
या दरम्यानच्या काळात अमरजित यांचे कुटुंब व इनोव्हातील चौघे जण रस्ता दुभाजकानजीक उभे होते. एकीकडे हे मदतकार्य सुरू असताना वेगाने येत असलेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसने प्रथमत स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
बसने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या इनोव्हा कारला धडक दिली आणि बाजूच्या खड्डय़ात कोसळली. (छाया- नरेंद्र वास्कर)
जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असताना. (छाया- नरेंद्र वास्कर) -
बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अशाप्रकारे बचावकार्य हाती घेण्यात आले होते. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
या अपघातात बसचा अशाप्रकारे चक्काचूर झाला होता.
-
मृतांमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक अविनाश कारंडे (३९) यांचा समावेश आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
गेल्या पाच वर्षांत या मार्गावरील अडीच हजार अपघातांनी ६०० हून अधिक जणांचे बळी घेतले आहेत.
-

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल