-
दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरूवात झाली आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. पण आज सकाळपासूनच एनडीएरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेतील एक राफ्टिंग बोट गुरुवारी सकाळी उलटली. या बोटीतील सर्व जवानांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
सावित्री नदीत पडलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यावेळी शोधकार्यासाठी नदीत उतरविण्यात आलेली राफ्टिंग बोट उलटली. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
या बोटीवर पाच जवान होते. पण लगेचच इतर राफ्टिंग बोटींच्या साह्याने इतर जवानांनी या बोटीतील जवानांना नदीतून बाहेर काढले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
नदीच्या पात्रात पडल्यानंतर इतर राफ्टिंग बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
-
मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळील जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेमुळे दोन एसटी बससह पाच ते सात वाहने सावित्री नदीत बुडाली. नदी बुडालेल्या वाहनांचा आणि प्रवाशांचा बुधवारी सकाळपासून शोध घेण्यात येतो आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
-
त्यासाठी एनडीआरएफची चार पथके, त्याचबरोबर तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. शोधमोहिमेत बुधवारी दोन मृतदेह सापडले होते. त्याचबरोबर गुरुवारी सकाळी एका पुरुषाचा आणि एका महिलेचा मृतदेह आंजर्ले आणि हरिहरेश्वर येथे आढळून आला. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. बुधवारी संध्याकाळी शोधकार्य अंधारामुळे थांबविण्यात आले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्याचवेळी राफ्टिंग बोट पाण्यात उलटल्याची दुर्घटना घडली. पण इतर जवानांनी पाण्यात पडलेल्या पाच जवानांना लगेचच बाहेर काढले. (छाया- नरेंद्र वास्कर)
मुंबई-गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीजवळील पूल कोसळल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. (छाया- नरेंद्र वास्कर) -
ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
-
एनडीआरएफचे जवान सावित्री नदीच्या पात्रात कसून शोध घेत आहेत. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
रिव्हर राफ्टर्स करताहेत प्रयत्नांची शर्थ (छाया- नरेंद्र वास्कर)
-
बोट उलटून नदीत पडलेल्या एनडीआरएफच्या जवानाला नदीतून बाहेर काढल्यानंतर. ( छाया- नरेंद्र वास्कर)
-
सावित्री शोधमोहीमेत क्रेनने गळ टाकण्यात आला आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
सावित्री शोधमोहीमेत क्रेनने गळ टाकण्यात आला आहे. (छाया- नरेंद्र वास्कर)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”