-
क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. क्युबन क्रांतीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचे काल रात्री १०.२९ वाजता निधन झाल्याचे क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले. फिडेल कॅस्ट्रो यांनी १९५९ ते १९७६ या काळात क्युबाचे पंतप्रधानपद तर १९७६ ते २००८ या काळात क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले होते.
-
१९५९ साली चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली. त्यानंतर फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष बनले.
-
जगभरात चर्चिल्या गेलेल्या या क्रांतीनंतर तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ फिडेल यांनी क्युबावर अधिराज्य गाजवले.
-
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभागृहात भाषण करताना क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो. ( संग्रहित छायाचित्र: सौजन्य – एपी)
-
फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वामुळे क्युबासारख्या इटुकल्या देशाने अमेरिकेसमोर जणू आव्हानच उभे केले होते.
-
क्युबाला सोव्हिएत रशियाची साथ होती. त्यामुळे रशियाचा धडा शिकवण्यासाठी त्यांनी कॅस्ट्रोवर राग काढण्यास सुरुवात केली. कॅस्ट्रो यांच्याविरोधात कारवाया करणाऱ्यांना अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने सर्व रसद पुरवली होती. कॅस्ट्रो यांची सत्ता उलथवून टाकू असा चंग अमेरिकेने बांधला. पण कॅस्ट्रोसारखा नेता अमेरिकेलाही बधला नाही.
-
एप्रिल महिन्यांत फिडेल यांनी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये शेवटचे भाषण केले होते.
-
क्युबामधील ओरिएंट प्रांतात १३ ऑगस्टच १९२६ रोजी फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. रोमन कॅथलिक स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन, पुढे हावाना विद्यापीठातून वकिली आणि समाजशास्त्रात पदवी मिळवली.
-
घरात श्रीमंती असूनही दिनदुबळ्यांच्या व्यथा फिडेल यांना जाणवत होत्या. अशातच त्यांच्यावर कार्ल मार्क्स आणि रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यानंतर ते कम्युनिस्ट विचारांकडे वळले.
-
अमेरिकेच्या भांडवलशाही वृत्तीला बंधू राऊल कॅस्ट्रो आणि क्रांतीकारी चे गव्हेरा यांच्या मदतीने आव्हान निर्माण केलं. मुंगीएवढा असलेल्या क्युबा देशाने बलाढ्य अमेरिकेलाही जेरीस आणलं. फिडेल कॅस्ट्रो हे क्युबामधील कम्युनिस्ट पार्टीचे पहिले सचिव होते. फेब्रुवारी १९५९ ते डिसेंबर १९७६ एवढा दीर्घ काळ त्यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…