-
राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्विनी यादव यांच्याशी नितीश यांचे संबंध गेल्या महिनाभरात कमालीचे ताणले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी संयुक्त जनता दलाच्या आमदारांच्या बैठकीत नितीश यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला.
-
नितीश यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
-
त्यानंतर काल रात्री या सगळ्या राजकीय नाट्यात खलनायक ठरलेल्या तेजस्वी यादव यांनीही आपली भूमिका मांडली. मी केवळ निमित्तमात्र ठरलो, नितीश यांना भाजपच्या गोटात जायचेच होते, असा पलटवार त्यांनी केला.
-
नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जदयू आणि भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली.
-
या बैठकीनंतर जदयू आणि भाजपच्या आमदारांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली.
-
या सगळ्यादरम्यान रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी पुन्हा राजभवनात आले. नितीश कुमार, सुशील मोदी राजभवनात पोहचले.
-
Will support Modi government in both houses : बिहारमधील या बदललेल्या सत्ता समीकरणाचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही झाला आहे.
-
लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी आज राजभवनात पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
-
भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची, तर सुशीलकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
-
नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना.
-
राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. महात्मा गांधी सेतूजवळ त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान, राजदच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली.
-
१९९१मधील खूनप्रकरणात तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने नितीशकुमारांनी प्रामाणिकतेचे ढोंग करून राजीनामा दिलाय. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर हातमिळवणी करून जनादेशाचा अपमान केला, असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला.
-

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार