-
देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी सादर केला जाणार आहे. देशातील नागरिकांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. सामान्यांसाठी त्या काय घोषणा करतील याकडे सर्वांची लक्ष लागलं आहे. यावेळी अर्थसंकल्प तयार करताना सहा जणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जाणून घेऊया सीतारमन यांच्या टीमबाबत…
-
CEA कृष्णमूर्ति सुब्रमण्यन: कृष्णमूर्ति सुब्रह्मण्यन यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आर्थिक सल्लागार पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकवत होते. ते बँकिंग, कॉर्पोरेट प्रशासन आणि आर्थिक नीतिचे जाणकार मानले जातात. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, प्रायमरी मार्केट, सेकेंडरी मार्केट आणि रिसर्चवर त्यांनी सेबीचे स्थायी समिती सदस्य म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिजनेसमधून आपलं पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
अतानू चक्रवर्ती: आर्थिक विषयांचे सचिव अतानू चक्रवर्ती गुजरात कॅडरच्या १९८५ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. जुलै महिन्यात त्यांना आर्थिक विभागात जबाबदारी सोपवण्यात आली. ते पेट्रोलियम मंत्रालयातील हायड्रोकार्बन विभागाचे महासंचालक म्हणूनही कार्यरत होते. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरात सरकारच्या गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारीही पार पाडली होती.
-
अजय भूषण पांडेय: महसूल सचिव भूषण पांडेय महाराष्ट्र कॅडरचे १९८४ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी UIDAI च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारीही पार पाडली होती. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग केलं आहे. तसंच त्यांनी मिनेसोना यूनिव्हर्सिटीमधून पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
राजीव कुमार: आर्थिक सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार हे १९८४ च्या झारखंड कॅडरचे IAS अधिकारी आहेत. आर्थिक संस्था, बँक, विमा कंपनी आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचा कार्यभार सांभाळत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणात आणि बँक रिकॅपिटलायझेशनमध्येही मोठं योगदान आहे. यापूर्वी त्यांनी बिहार, झारखंड सरकार आणि केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या मंत्रालयांमध्येही त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांना आतापर्यंत ३३ वर्षांच्या अनुभव आहे.
-
टीव्ही सोमनाथन: सोमनाथ हे जमा-खर्च विभागाचे सचिव आहेत. त्यांनी जागतीक बँकेतही आपली सेवा बजावली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केलं आहे. नुकतीच त्यांची नॉर्थ ब्लॉकमध्ये एन्ट्री झाली आहे. सोमनाथ हे १९८७ च्या बॅचचे तमिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली आहे.
-
तुहीन कांत पांडे: तुहीन कांत पांडे हे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते १९८७ च्या बॅचचे ओदिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत.
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…