-
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यावेळी त्यांनी देशातील पाच पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आलेल्या उत्खननाच्या ठिकाणी वास्तूसंग्राहालये उभारण्याची घोषणा केली आहे. पाच वेगवगेळ्या राज्यांमध्ये जागतिक दर्जाची वास्तुसंग्राहलये उभारली जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. जाणून घेऊयात कुठे कुठे उभारण्यात येणार आहेत ही वास्तुसंग्रहालये जाणून घेऊयात…
-
राखीगढी (हरियाणा) देशातील पुरातत्व अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.
-
हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) हस्तिनापूरमध्ये महाभारताच्या काळाशी साधर्म्य साधणारे काही पुरातन अवशेष अढळून आले आहेत.
-
ढोलविरा (गुजरात) हे ठिकाण हडप्पन संस्कृतीतील मोठे शहर आहे व त्या काळातही ते बंदराचे शहर होते.
-
शिवसागर (आसाम) पुरातत्व संशोधनासाठी ईशान्येमधील राज्यांतील हे सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे.
-
आदिचेल्लनूर (तामिळनाडू) दक्षिणेकडील सर्वात जुन्या उत्खननाच्या ठिकाणींपैकी एक आहे. येथे १८७६ पासून संशोधन केले जात आहे.

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?