-
जगातील सर्वात शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारतीय दौऱ्यावर आले आहेत. आज (सोमवारी) सकाळी ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे स्वागत केलं.
-
अहमदाबाद विमानतळावर मोदींनी ट्रम्प यांची गळभेट घेतली. तर अमेरिकेच्या प्रथम महिला असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्पही होत्या. मोदींनी नमस्कार करत मेलेनिया यांचं स्वागत केलं.
-
मात्र मोदींनी ट्रम्प दांपत्याचे स्वागत करताना तेथे उपस्थित असणाऱ्या एका महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही महिला कोण आहे याबद्दल चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या फोटोत दिसणारी ही महिला आहे तरी कोण? चला या गॅलरीमधून जाणून घेऊयात…
-
मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्याबरोबर फोटोत झळकणाऱ्या महिलेचं नाव आहे गुरदीप कौर चावला.
-
गुरदीप पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अनुवादक (इंटरप्रिटर) म्हणून काम करतात.
-
गुरदीप या अमेरिकन ट्रान्सलेटर असोसिएशनच्या सदस्या आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यांवर जेव्हा केव्हा हिंदीमध्ये भाषण देतात तेव्हा गुरदीप त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करतात.
-
गुरदीप अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भारतामध्ये दौऱ्यावर आलेल्या परदेशी नेत्यांबरोबर दिसल्या आहेत.
-
पंतप्रधानांनी हिंदीत भाषण दिल्यावर गुरदीप त्या भाषणाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करते. यामुळे परदेशातील नेत्यांना मोदी काय बोलले हे समजते.
-
१९९० साली गुरदीप यांनी भारतीय संसदेमधून अनुवादक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली.
-
मात्र १९९६ साली लग्न झाल्यानंतर काही काळाने गुरदीप अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या.
-
२०१० मध्ये त्या अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर अनुवादक म्हणून भारत दौऱ्यावर आल्या होत्या.
-
२०१४ साली मेडिसन स्वेअर गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमामध्ये गुरदीप उपस्थित होत्या. त्यांनी तिथे अनुवादक म्हणून कामं केलं होतं. तेथूनच त्या पंतप्रधानांच्या ताफ्याबरोबर वॉशिंग्टन डीसीला गेल्या होत्या.
-
गुरदीप यांना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे उत्तम ज्ञान आहे.
-
गुरदीप यांचे भाषेवर असणारे प्रभुत्व पाहूनच त्यांच्या खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवण्यात येते.
-
मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ते आपल्या भाषणामध्ये तेथील स्थानिक भाषेचा समावेश करुन अनेकदा भाषणाची सुरुवात करतात. अशावेळी मोदी गुरदीप यांची मदत घेतात.
-
भारताबरोबरच अनेक परदेश दौऱ्यांमध्ये गुरदीप मोदींच्या भाषणाच्या वेळी उपस्थित असल्याचे दिसून आलं आहे.
-
गुरदीप यांना १५ आंतरराष्ट्रीय भाषा येतात असं म्हटलं जातं.
-
गुरदीप मागील ३० वर्षांपासून अनुवादक म्हणून काम करत आहेत.
-
"आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे भाषण ऐकताना पूर्ण एकाग्रतेने ते ऐकावं लागतं," असं गुरदीप सांगतात.
-
"आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे भाषण ऐकून त्याचा अनुवाद करुन तो मोजक्या शब्दात आणि योग्य अर्थासहीत करावा लागतो. कारण येथे एकदा चूक झाल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागते," असं गुरदीप सांगतात.
-
गुरदीप या मुळच्या पंजाबच्या आहेत.
-
परदेशी नेत्यांच्या दौऱ्याच्या वेळी गुरुदीप या मोदींच्या अनुवादक म्हणून काम करतात.
-
अनेकदा त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांसाठी मोदींबरोबर उपस्थित असतात.
-
अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची मोदींबरोबरची झकल कॅमेरात टीपली जाते.
-
भारताबरोबरच परदेशातही अनेकदा गुरुदीपच मोदींच्या अनुवादक म्हणून काम करतात.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं