-
जगातील सर्वात शक्तीशाली देश असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारतीय दौऱ्यावर आले आहेत.
-
सोमवारी सकाळी ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे स्वागत केलं.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यामध्ये अमेरिकेच्या प्रथम महिला असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि जावईही त्यांच्यासोबत आहेत. सध्या भरातीयांमध्ये चर्चा आहे ती मेलेनिया ट्रम्प यांच्या पोशाखाची.
-
ट्रम्प दांपत्याचे मोदींनी अहमदाबाद विमानतळावर स्वागत केले त्यावेळी ट्रम्प यांनी निळ्या रंगाचा सूट आणि टाय असा पोशाख केल्याचे दिसून आले तर मेलेनिया या पांढऱ्या रंगाच्या जंप सूटमध्ये दिसून आल्या.
-
खास करुन मेलेनिया यांनी पांढऱ्या रंगाच्या जंप सूटवर कंबरेभोवती गुंडळलेला हिरव्या रंगाचा पट्टा चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
-
अहमदाबादमधील साबरमती आश्रम असो, मोटेरा स्टेडियममधील भव्य सभा असो की ताज महालचा दौरा असो मेलेनिया यांच्या स्टाइल स्टेमेंटची चांगलीच चर्चा सुरु असल्याचे दिसून आले.
-
मेलेनिया यांनी कंबरेला बांधलेल्या हिरव्या रंगाच्या कापडाची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरु होती.
-
सगळीकडे चर्चा असणारा मेलेनिया यांनी कंबरेभोवती बांधलेले हिरव्या रंगाचे कापड साधेसुधे नाही. हा ड्रेस डिझाइन करताना खास हे कापड तयार करण्यात आलं आहे.
-
मेलेनिया यांनी खास भारत दौऱ्यासाठी हा जंप सूट बनवून घेतल्याचे समजते.
-
मेलेनिया यांचा हा पांढऱ्या रंगाचा जंप सूट हेर्वे पियरे या अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन डिझायनरने तयार केला आहे.
-
मेलेनिया यांच्या या ड्रेसचा भाग असणाऱ्या आणि पाहता क्षणी उठून दिसणाऱ्या कंबरेभोवतीच्या कापडी बेल्टचे महत्व हेर्वे यांनी स्वत: सांगितलं आहे. हा कापडी पट्टा ब्रोकेट फॅब्रिकपासून बनवण्यात आल्याचे हेर्वे सांगतात.
-
"पारंपारिक भारतीय वेशभूषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या कमरपट्ट्यासारखा हा पट्टा आहे. २० व्या शतकामध्ये भारतात अशाप्रकारे कंबरेला पट्टा बांधण्याची पद्धत होती," असं हेर्वे म्हणतात.
-
पॅरिसमधील एका कार्यक्रमादरम्यान एका मित्राने मला या विशेष पोशाखाची कल्पना दिल्याचे हेर्वेंनी सांगितले. हिरव्या रंगाच्या या कापडी बेल्टवर रेश्मी धाग्यांनी नक्षीकाम करण्यात आलं आहे.
-
मेलेनिया यांनी पांढऱ्या जंप सूटवर बांधलेल्या बेल्टच्या किनाऱ्यांवर सोने रंगाच्या रेश्माच्या धाग्यांनी जास्त प्रमाणात नक्षीकाम करण्यात आल्याने तो उठून दिसतो.
-
हा बेल्ट डिझाइन करताना सोनेरी तारांनी खास नक्षीकाम करण्यात आले आहे.
-
मेलेनिया यांच्या ड्रेसवरील या हिरव्या रंगाच्या कापडी बेल्टवरील नक्षीकाम हे मुघलकालीन शैलीचे आहे. मुघलकालीन शैलीचे नक्षीकाम असल्याने त्यामध्ये फूल आणि पानांऐवजी भौमितीक आकारांवर भर दिल्याचे दिसून येते. मुघलकालीन स्थापत्यकलेमध्ये आणि वस्त्रांवर अशाप्रकारचे नक्षीकाम दिसून येते.
-
जंप सूट या परदेशी पद्धतीच्या ड्रेसवर मेलेनिया यांनी हा खास हिरव्या रंगाचा कापडी बेल्ट वापरुन या पाश्चिमात्य पोशाखाला भारतीय टच देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलं.
-
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया अहमदाबाद येथील मोटेरा स्डेटियमवरील कार्यक्रमानंतर आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेले. दोघांनाही ताजमहलच्या परिसरात फिरून या वास्तूचा इतिहास आणि स्थापत्यकलेबद्दल माहिती जाणून घेतली. नितीन कुमार सिंह यांनी या वास्तूची माहिती ट्रम्प दांपत्याला दिली.
-
दोघांनाही सिंह यांनी ताज समोर असणाऱ्या डायना बेंचवर बसून फोटो काढण्यास सांगितलं. मात्र दोघांनीही बसून फोटो काढण्यास नकार देत उभ्यानेच फोटो काढून घेतले.
-
त्यानंतर दोघेही दिवसभराचे कार्यक्रम संपवून दिल्लीला रवाना झाले.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं