-
निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता तिहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं. आज सकाळी साडेपाच वाजता मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) या चारही आरोपांनी तिहार तुरुंगामध्ये फासावर लटवण्यात आलं. डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती.
-
मागील सात वर्षांपासून सुरु असणारा हा खटला अगदी फाशीच्या काही तास आधीपर्यंत सुरु होता. अखेर न्यायालयाने या चौघांना फाशीच देण्यात यावी यावर ठाम असल्याचे सांगितल्यानंतर आज या चौघांना फाशी देण्यात आली. मात्र अशाप्रकारे मागील २० वर्षांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेले हे काही पहिले प्रकरण नाही. मागील १६ वर्षांमध्ये म्हणजेच २००४ पासून आतापर्यंत देशात एकूण आठ जणांना अशी फाशी देण्यात आली आहे. त्यांच्याबद्दलच आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
२००० सालापासून बोलायचं झाल्यास सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते म्हणजे धनंजय चॅटर्जी याचं. धनंजयला बलात्कार आणि खून्यात दोषी ठरवण्यात आल्यानंतर २५ जून २००४ रोजी कोलकात्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
-
धनंजयने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला होता. सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या धनंजयला आरोपी ठरवण्यात आलेला खटला रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचे न्यायालयाने म्हटलं होतं. धनंजयला कोलकात्यामधील अलीपूर मध्यवर्ती तुरुंगामध्ये १४ ऑगस्ट २००४ रोजी फासावर लटकवण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी धनंजयची माफीची याचिका फेटाळली होती. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच धनंजयला फाशी देण्यात आली.
-
अजमल कसाब हे नाव ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीणच. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार असलेल्या दहशतवादी कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं.
-
कसाबसह दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गोळीबारामध्ये दीडशेहून अधिक लोक मारले गेले होते. २००८ साली झालेल्या या हल्ल्यादरम्यान पोलिसांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबविरोधात ११ हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली होती. फाशीपासून वाचण्यासाठी कसाबने अनेकदा आपला जबाब बदलला. त्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. तो अर्ज २ नोव्हेंबर २०१२ रोजी राष्ट्रपतींनी फेटाळला. त्यानंतर पुढल्या नऊ दिवसांमध्येच म्हणजेच २१ नोव्हेंबरला कसाबला फासावर लटकवण्यात आलं. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यामध्ये अंत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती.
-
दिल्लीमध्ये २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार अफजल गुरु याला ९ फेब्रुवारी रोजी दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली. राष्ट्रती प्रणब मुखर्जी यांच्याकडे अफजलने दयेचा अर्ज केला होता तो फेटाळल्यानंतर तिसऱ्याच दिवशी अफजल गुरुला फासावर चढवण्यात आलं.
-
१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा कट अफझलने रचल्याचा दावा पोलिसांनी केला. १५ डिसेंबर २००१ रोजी दिल्ली पोलिसांनी अफझलला अटक केली. त्यानंतर न्यायलयात सर्व साक्षी पुरावे सादर केल्यानंतर जवळजवळ एका वर्षानंतर म्हणजेच १८ डिसेंबर २००२ साली त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर अफझलला माफ करण्याकरता अनेक याचिका दाखल करण्यात आल्याने त्याला फासावर चढवण्यासाठी ११ वर्षांचा कालावधी लागला. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफझलला फाशी देण्यात आली.
-
मुंबई शहराला हदरवून सोडणाऱ्या १९९३ च्या १३ साखळी बॉम्बस्फोटांना पैसा पुरवणे आणि या हल्ल्याचा कट रचण्याच्या गुन्ह्याखाली याकूब मेमनला अटक करण्यात आली होती. याकूबचा भाऊ टायगर मेमन आणि अद्यापही फरारी असलेला दाऊन इब्राहिम हे दोघे या हल्ल्यामधील इतर दोन प्रमुख आरोपी आहेत. एकूण २५७ लोकांचा या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यू झाला होता.
-
याकूब मेमनला ३० जुलै २०१५ रोजी फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याकूबला फाशी देण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच करण्यात आलेल्या या नव्या याचिकेमुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, रात्रभर चाललेल्या सुनावणीनंतर गुरूवारी पहाटे न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याकूबला फाशी देण्याचा निर्णय देण्याचा योग्य असल्याचा निकाल दिला. यावेळी बचावपक्षातर्फे करण्यात आलेले सर्व दावे न्यायालयाने फेटाळून लावले. याकूबला त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधी मिळाली होती. त्यामुळे आता या खटल्यात अधिक वेळ घालवणे योग्य नाही. याशिवाय, न्यायप्रक्रियेनुसार याकूबला त्याच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी देण्यात आल्याचे न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांनी म्हटले. अखेर नागपूरमध्ये याबूकला फाशी देण्यात आली. धनंजय चॅटर्जीप्रमाणे याकूबलाही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच सकाळी आठ वाजता याकूबला फासावर लटकवण्यात आलं.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”