-
करोनामुळे इटलीत मृत्यूचं तांडव का सुरु आहे?, इटलीत इतक्या जाणांचे मृत्यू का होत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Photo – AP)
-
इटलीमध्ये करोनामुळे सुरु असणाऱ्या मृत्यू तांडवाची कारणे देताना तज्ज्ञांनी देशाचे सरासरी वयोमान अधिक असण्यापासून ते आरोग्य यंत्रणांचे अपयश अशी अनेक कारणे सांगितली आहेत. इटलीमध्ये करोनामने थैमान घातलं असून मागील अनेक पिढ्यांनी पाहिली नाही अशी भयंकर स्थिती सध्या इटलीत निर्माण झाली आहे. अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या का आहे याबद्दलच या फोटोगॅलरीमधून आपण जाणून घेणार आहोत.
-
जास्त वयोमान असणारा देश – इटलीमधील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी पाहिली तर इटलीचे सरासरी वयोमान हे अधिक असल्याचे दिसून येते. या देशाचे मागील वर्षी सरासरी वयोमान ४५.५ वर्षे इतके होते. युरोपीयन देशांपैकी इटली हा सर्वाधिक सरासरी वयोमान असणाऱ्या नागरिकांचा देश आहे. चीनमधील सरासरी वयोमानापेक्षा इटलीमधील सरासरी वयोमान सात वर्षांनी अधिक आहे. (फाइल फोटो)
-
शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये मरण पावलेल्या करोनाच्या रुग्णांचे सरासरी वय हे ७८.५ वर्षे इतकं आहे. येथे करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या साडेपाच हजारहून जास्त आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या ५० हजारहून अधिक आहे.
-
इटलीतील करोनाग्रस्त मृतांपैकी ९९ टक्के रुग्णांना आधीपासूनच एका गंभीर आजाराने ग्रासलेलं होतं असही पहाणीमध्ये समोर आलं आहे. (AP Photo File)
-
(प्रातिनिधिक फोटो)
-
जपान हा जगातील सर्वाधिक सरासरी वय असणारा देश आहे. जपानमधील नागरिकांचे सरासरी वय ४७.३ वर्षे इतके आहे. असं असलं तरी तेथील सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे तेथील करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३५ इतका आहे. त्यामुळे इटलीमधील मृत्यू तांडवासाठी वय हा एकमेव मुद्दा नाहीय हे स्पष्ट होतं. (Photo – Nadia Shira Cohen The New York Times)
-
वैज्ञानिकांच्या मते करोना चीननंतर इतर कोणत्याही देशात पसरु शकला असता. “इटलीच का हा सर्वात महत्वाच्या प्रश्न असल्याचे मला वाटते. त्याचे उत्तर कोणतेही विशेष कारण नाही असं देता येईल”, असे मत कॅनडामधील सीबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाचे प्राध्यापक याश्चा मॉन्यूक यांनी व्यक्त केलं आहे. “इटली आणि इतर देशांमध्ये फरक इतकाच आहे की जर्मनी, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांपेक्षा दहा दिवस आधी इटलीमध्ये करोनाचे रुग्ण सापडले,” असं मॉन्यूक म्हणाले. (Photo- AP)
-
इटलीमध्ये करोनामुळे साडेपाच हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमधील लॅम्बार्डी प्रांताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील ७८ वर्षीय बिल्डर हा करोनामुळे मरण पावलेला युरोपातील पहिला रुग्ण ठरला.
-
इटलीप्रमाणे आता स्पेन आणि फ्रान्समध्येही करोनामुळे मृत्यूचा दर वाढत आहेत. या देशांनी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही तर इटलीप्रमाणे इथेही करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढेल अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
-
इटलीमधील आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा ही जगातील अव्वल आरोग्य यंत्रणांपैकी एक मानली जाते. मात्र करोनाग्रस्तांचा आकडा वाढत गेला आणि ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. करोनाग्रस्तांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी इटलीमधील आरोग्य सेवा कमी पडू लागली त्याचवेळी देशात करोनाचा फैलाव अधिक झाल्याने परिस्थिती आणखीन बिकट झाली. (Photo – Giulia Marchi The New York Times)
-
रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरी यंत्रणा यामुळे अनेक ठिकाणी तर डॉक्टरांना वयोवृद्ध रुग्णांकडे नाइलाजास्तव दूर्लक्ष करावं लागलं. अनेक ठिकाणी वयस्कर रुग्णांऐवजी जे रुग्ण आजारातून बरे होण्याची शक्यता आहे, अशा रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर झटत आहेत. (AP Photo File)
-
करोना आता दारिद्र्य रेषेखालील लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये पसरेल अशी भिती इटली सरकारला आहे.
-
इटलीमधील कुटुंब व्यवस्थाही काही प्रमाणात या रोगाचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. येथील वृद्ध व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहतात. येथे अनेक कुटुंब ही आपल्या वृद्धांच्या संपर्कात येत असतात. (Photo – AP)
-
ग्रामीण भागातील युवा वर्ग मोठा संख्येने कामासाठी शहरात येतात. मात्र संयुक्त कुटुंब पद्धतीन असल्याने हे तरुण नंतर वयोवृद्ध कुटुंबसदस्यांबरोबरच राहतात. त्यामुळे वयोवृद्धांमध्ये या आजाराचा प्रसार अधिकप्रमाणात झाला. इटलीमधील ग्रामीण भागामध्ये शहरी भागातून गेलेल्या नोकरदारवर्गामुळे करोनाचा प्रासर झाल्याचे सांगितले जाते. (Photo Damini Ralleigh)
-
कोवीड-१९ ची चाचणी करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा आणि सामुग्री नाही हे अनेक देशांना इटलीमधील परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात आलं. इटलीमध्ये सुरुवातीला केवळ लक्षणं असणाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या.
-
या उलट दक्षिण कोरियाने दिवसाला १० हजारहून अधिक जणांच्या चाचण्या घेत करोनाला फैलाव रोखण्यात काही प्रमाणात यश मिळवलं. (Photo – Reuters)
-
-
जर्मनीनेही दक्षिण कोरियाप्रमाणे करोनाची अगदी सूक्ष्म लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्याही चाचण्या करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की जर्मनीमधील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी झाला. (Photo -Reuters)
-
याच आकडेवारीनुसार अमेरिकेने दिवसाला एक लाख चाचण्या केल्या तर करोनाचा फैलाव थांबवता येईल असा विश्वास हार्डवर्ड विद्यापिठाचे प्राध्यापक मिश्चेल मिना यांनी व्यक्त केला आहे. (Photo: The Indian Express)
-
इटलीने केलेला चुका आपण करु नये म्हणून अनेक देश इटलीमधील परिस्थितीचा अभ्यास करत आहेत. अनेक देशांनी खबरदारीचे उपाय म्हणून आधीच शहरे लॉकडाऊन करण्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद करण्यापर्यंतचे निर्णय घेतले असून आपला देश दुसरा इटली ठरु नये अशीच सर्वांची इच्छा आहे. (Photo -Reuters )

Aligarh Love Story: पळून गेलेले सासू-जावई दहा दिवसांनी परतले घरी, सासू आता म्हणते…