-
अनेकदा आपण अभिनेते अभिनेत्रींच्या घरांचे फोटो पाहतो. परंतु नेतेमंडळींची घरं कशी असतील याची उत्सुकता आपल्याला असते. आपण पाहणार आहोत कशी आहेत नेत्यांची घरं.
-
२४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या वडिलांची पुण्यतिथी होती त्या दिवशी त्यांनी आपल्या घरातील काही फोटो शेअर केली होते. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
पासवान यांनी आपल्या घरात आपल्या वडिलांची एक मूर्ती तयार केली आहे. त्यांनी या दिवशी आपल्या वडिलांना नमन करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
हा फोटो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरातील आहे. त्यांच्या घरात स्वामी विवेकानंद यांच्यापासून सावरकरांच्या प्रतिमा आहेत. (फोटो सौजन्य, एएनआय)
-
हा फोटो नितीन गडकरी यांच्या घरातीलच आहे.
-
अनेकदा गडकरी आपल्या घरातचं बैठकांचं आयोजन करत असतात. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
हा फोटो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरातील आहे. त्यांच्या घरातील भिंतींवर सावरकर आणि चाणक्य यांचे फोटो पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
अनेकदा घरातील या ठिकाणी अमित शाह हे बैठकीचं आयोजन करत असतात. (फोटो- भाजपा ट्विटर)
-
हा फोटो केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या घरातील आहे. २५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमादरम्यान त्यांनी तो शेअर केला होता. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
अनुराग ठाकूर यांच्या घरात हनुमानाचं छोटं मंदिर आहे. अर्थसंकल्पादरम्यान त्यांच्या घरातील हा फोटो समोर आला होता.
-
हा फोटो केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर य़ांच्या घरातील आहे. ते सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असतात. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
रामायण या मालिकेचं पुनर्प्रसारण दूरदर्शनवर करण्यात आलं होतं. त्यावेळी जावडेकर यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला होता. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. यापूर्वी अनेकदा त्यांनी आपल्या घरातील फोटो शेअर केले होते. त्यांना मॉडर्न आर्ट पेंटिंगची फार आवड आहे. त्यांच्या घरातील भिंतींवर ही पेंटिंग्स पाहायला मिळतात. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
स्मृती इराणी यांच्या घरातील भिंतीवर पंचमुखी हनुमानाचीही प्रतिमा पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य -ट्विटर)
-
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनीदेखील आपल्या घरातील फोटो शेअर केला होता. ( फोटो सौजन्य -ट्विटर)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं