-
तुम्ही आतापर्यंत डेकर बसने प्रवास केला असेल किंवा अगदी डबल डेकर ट्रेननेही तुम्ही प्रवास केला असेल मात्र लवकरच तुम्हाला डबल डेकर विमानानेही प्रवास करता येणार आहे असं सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र करोनानंतर जग बदलणार असल्याचे संकेत देणारं डबल डेकर विमानाचं नवं डिझाइन सध्या चांगलचं चर्चेत आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
या डबल डेकर डिझाइनच्या मदतीने प्रवासादरम्यान आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार आहे. या नव्या डिझानसंदर्भातील वृत्त सीएनएनने दिलं आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
डिझायनर जेफरी ओनिल यांनी या झेफर सीट्स नावाच्या नव्या डिझाइनच्या सीट तयार केल्या आहेत. या सीटच्या मदतीने टू- फोर- टू या पद्धतीने प्रवाशांच्या बसण्याची सोय विमानामध्ये करता येणार आहे. जेफरी यांनी झेफर एरोस्पेस या कंपनीअंतर्गत या सीटची डिझाइन तयार केली आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
दोन वर्षांपूर्वी त्या काळातील सर्वात लांबचं उड्डण असणाऱ्या न्यू यॉर्क ते सिंगापूर प्रवासादरम्यान जेफरी यांना विमानामध्ये आसन व्यवस्थेमुळे नीट झोपली लागली नव्हती. त्यानंतरही अनेक विमान प्रवासादरम्यान त्यांना असाच अनुभव आल्याने त्यांनी ही विशेष डिझाइन तयार करण्याचा विचार केल्याचे सीएनएनने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
"अनेक विमान कंपन्यांनी १९७० च्या दशकानंतर आपल्या आसन व्यवस्थेमध्ये विशेष बदल केलेले नाहीत. इकनॉमी क्लासमधील ९९ टक्के सीट या ठरलेल्या जागी असतात. त्या आसनांवर आरामशीर पद्धतीने झोपणं शक्यचं नसतं. या आसनांवर अडकून पडल्यासारंखं होतं. जास्त वेळ त्यावर बसणं शक्य नसतं आणि ते आरोग्यासाठी धोकायक असतं," असं जेफरी यांनी स्थापन केलेल्या स्टार्टअप कंपनीची वेबसाईट म्हणजेच रिपब्लिक डॉट कॉम झेफर एरोस्पेसचं म्हणणं आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
या वेबसाईटने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये ७० टक्के विमान प्रवाशांनी या सीट मागे सरकराणाऱ्या आणि सामाधानकारक असणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर "विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक स्तरानुसार वेगळी सुविधा देण्याबरोबरच विमानामधील आसनव्यवस्थेची रचना बदलण्याची, अधिक सोयीस्कर करण्याची आणि आरोग्यासाठी फायद्याची असेल अशी करण्याची गरज आहे," असं वेबसाईटने म्हटलं आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
या नव्या डबल डेकर डिझाइनमुळे इकनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्तात चांगली सुविधा उपलब्ध होईल. (फोटो: Zephyr aerospace)
-
त्याचप्रमाणे या सीटचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे विमान प्रवास जास्त काळ असेल तर यावर व्यवस्थित झोपताही येणं शक्य आहे. (फोटो: Zephyr aerospace)
-
या सीट प्रवाशांबरोबरच विमान कंपन्यांनाही फायद्याचा आहेत. कारण डबल डेकर सीट व्यवस्थेमुळे सीटची संख्या कमी होणार नाही. (फोटो: Zephyr aerospace)
-
एकंदरीतच थोडक्यात सांगायचं म्हणजे हा विमान प्रवास आताच्या विमानप्रवासापेक्षा अनेक अर्थांने वेगळा आणि आरामदायी असणार पण तो कधी सुरु होणार हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही. (फोटो: Zephyr aerospace)

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?