-
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांप्रमाणेच पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील सेक्स वर्कर महिलांनादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
त्यांच्या खाण्यापिण्याचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कायाकल्प आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी शनिवारी त्यांच्या वस्तीत धान्याचे वाटप केले.
-
हे धान्य मिळवण्यासाठी या महिलांनी रांग लावली होती. तर यावेळी मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचेही दिसून आले.
-
येथील अनेक सेक्स वर्कर महिलांबरोबर त्यांची लहान मुलंदेखील राहत असल्याने, त्यांच्यादेखील खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे.
-
या महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, मात्र त्यांच्याही मुलभूत गरजा असतात. त्यांनाही आपल्या कुटुंबासाठी अन्नधान्याची गरज असतेच.
-
या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला गेल्याचे दिसून आले आहे.
-
या महिलांबरोबर असणाऱ्या त्यांच्या मुलांच्या भविष्याचा व आरोग्याचादेखील प्रश्न अनेकदा प्रकाशझोतात आलेला आहे.
-
सध्याच्या अडचणीच्या काळात त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, या भावनेतून त्यांच्या भागात धान्याचे वाटप केले गेले.

‘पारू’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची होणार Exit! स्वत: फोटो शेअर करत म्हणाली, “शेवटचा…”