-
करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे आजवर अटोक्यात असलेली ही साथ वाढून आव्हान उभे राहील असे सांगताच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पोलिसांना दिले आहेत. याची अंमलबजावणी तातडीने सुरु झाली असून मंगळवारी सकाळपासूनच पोलीस वाहनांना थांबवून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसले. (सर्व फोटो: निर्मल हरींद्रन)
-
अनेकजण पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांच्याशी रस्त्यावर हुज्जत घालताना दिसून आले. मात्र पोलिसांनाही कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
-
पोलिसांनी अनेकांची दुचाकी वाहने जप्त केली आहेत. अशाप्रकारे सकाळच्या सत्रामध्येच पोलिसांनी हजारो वाहने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
-
अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहने जप्त करुन ती जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जवळच्या जागेत हलवली आहेत.
-
पोलिसांनी हजारोच्या संख्येने दुकाचीस्वारांवर कारवाई केली असून त्यासंदर्भातील रितरस नोंदही करण्यात आली आहे.
-
आमची गाडी जप्त करु नये अशी विनंती अनेकजण पोलिसांकडे करताना दिसत आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेत नसतानाही फिरणाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
-
प्रत्येक सिग्नलवर अनेक पोलीस उपस्थित असून गाड्यांमधून नागरिक कशासाठी व कुठे चालले आहेत याची चौकशी केली जात आहे.
-
अनेक ठिकाणी पोलिसांनी चारचाकी गाड्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.
-
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात आहे. त्याचीही रितसर नोंद पोलीस ठेवताना दिसत आहेत.
-
जप्त करण्यात आलेल्या गाड्या या आता दंडाची रक्कम भरल्यानंतर काही दिवसांनीच परत केल्या जातील असं सांगण्यात येत आहे.
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…