-
सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. भारतातही करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण सात लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु भारतातील एक प्रदेश असाही आहे ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही करोनाचा रुग्णच सापडला नाही.
-
करोनापासून दूर असलेला भारताचा हा एकमेव प्रदेश म्हणजे लक्षद्वीप. या ठिकाणी आतापर्यंत एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे, ज्या ठिकाणी सर्वांनी करोनाचा शिरकावच होऊ दिला नाही.
-
जगातील आणि देशातील अनेक ठिकाणी करोनानं थैमान घातलं असताना लक्षद्वीप यापासून कसा दूर राहिला हा प्रश्न सर्वांनाच असेल.
-
करोनापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम पर्यटकांच्या या ठिकाणी येण्यावर पूर्णपणे बंदी घातल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं बोलताना दिली.
-
तसंच करोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव निर्माण झाल्यावर केवळ जे या ठिकाणचे स्थायी रहिवासी आहेत त्यांनाच केवळ परतण्याची परवानगी देण्यात आली.
-
तसंच त्यांना परतण्यापूर्वी करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती आणि चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना परतण्याची परवानगी दिल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.
-
आतापर्यंत देशात एकूण ७ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल ४ लाख ३० हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे २० हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यूदेखील झाला आहे.
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…