-
देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारत असेल किंवा अन्य देश असतील सर्वच देशांमधील शास्रज्ञ करोनावरील लस तयार करण्यात दिवसरात्र एक करत आहेत. (सर्व फोटो – संग्रहित)
-
याच दरम्यान एका शेतकऱ्याचा मुलगाही देशातील करोनावरील लस तयार करण्यास आपल्या टीमसोबत दिवसरात्र एक करत आहे. त्यांचं नाव आहे डॉ. कृष्णा एला.
-
त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांच्या आणि मेहनतीच्या जोरावर एक छोटी लॅब तयार सुरु केली होती.
-
परंतु कालांतरानं त्यांनी त्या लॅबला एका मोठ्या कंपनीत बदललं. आता त्यांची कंपनी देशातील करोनाची लस तयार करण्याचं काम करत आहे.
-
देशातील पहिली करोना लस १५ ऑगस्ट रोजी लाँच करण्याचा मानस असल्याचं वृत्त मध्यंतरी आलं होतं. सध्या या लसीच्या मानवी चाचणीसाठीही परवानगी देण्यात आली आहे.
-
हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीद्वारे ही लस तयार करण्यात येत आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्यानं ही लस तयार करण्यात येत आहे.
-
यापूर्वीही कंपनी प्रकाशझोतात आली होती. यापूर्वी कंपनीनं हेपेटायटिसची लस तयार केली होती. तसंच झिका व्हायरससाठी लस तयार करणारी जगातील पहिल्या कंपनीचा मानही त्यांनी मिळवला होता.
-
डॉ. कृष्णा एला यांचा जन्म तामिळनाडूतील थिरूथानीमध्ये झाला होता. ते एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आले आहेत.
-
बायोटेक्नॉलॉजिच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारे त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच व्यक्ती आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या इथपर्यंतच्या प्रवासाचं वर्णनही केलं होतं.
-
त्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे सुरूवातीला शेतीचंच शिक्षण घेतलं. तसंच शेती करण्याचाच विचारही त्यांनी केला होता.
-
-
त्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेले.
-
त्यानंतर त्यांनी हवाई विद्यापीठातून मास्टर्स केलं आणि नंतर मेडिसन विद्यापीठातून पीएचडीदेखील केलं.
-
त्यानंतर ते अमेरिकेतच स्थायिक होण्याचा विचार करत होते. परंतु आपल्या आईसाठी ते परत आले. त्यानंतर हैदराबादमध्ये त्यांनी भारत बायोटेक नावाची लॅब सुरू केली आणि त्या ठिकाणी आपलं काम सुरू केलं.
-
डॉ. कृष्णा यांना आतापर्यंत १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…