-
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. यादरम्यान पोलिसांनी विकास दुबेला ठार केल्याचं सांगण्यात येत आहे.
-
विकास दुबे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. उत्तर प्रदेशांचं विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन कानपूरसाठी सकाळी निघालं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आणि गाडी पलटली झाली. गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबेने पोलिसांचं शस्त्र खेचून घेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं पण त्याने माघार घेतली नाही. विकास दुबेने केलेल्या गोळीबारात विशेष पथकातील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबारात विकास दुबे जखमी झाला असता त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांना त्याला मृत घोषित केलं.
-
मात्र अशाप्रकारे पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना आरोपी चकमकीमध्ये ठार झाल्याची ही काही पहिलीच घटना नाहीय. पाहूयात अशीच काही प्रकरणं ज्यामध्ये गाडीचा अपघात झाल्यानंतर चकमक घडली…
-
हैदराबाद बलात्कार प्रकरण: हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली होती.
-
हैदराबाद या एन्काउंटरमध्ये प्रमुख भूमिका बजावली ती आयपीएस अधिकारी असणाऱ्या व्ही. सी. सज्जनार यांनी. या एन्काउंटरची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी सज्जनार यांचे अभिनंदन केलं होतं.
-
६ डिसेंबरच्या पहाटे हौदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपांना पोलीस पंचनाम्यासाठी घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडलं हे सांगण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्यास सांगितले. मात्र अनेकदा सांगूनही ते थांबले नाही तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्येच चौघाचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
-
६ डिसेंबरच्या पहाटे हौदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपांना पोलीस पंचनाम्यासाठी घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडलं हे सांगण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्यास सांगितले. मात्र अनेकदा सांगूनही ते थांबले नाही तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्येच चौघाचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
-
वारंगल अॅसिड हल्ला प्रकरणामध्ये एस. श्रीनिवास राव या मुख्य आरोपीबरोबरच पी. हरी कृष्णन, संजय अशा एकूण तीन जणांना पोलिसांनी ठार केले होते. या तिघांनी मामोनूर येथे स्वप्नीका आणि प्रणीता या मुलींवर अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये श्रीनिवासची प्रेयसी स्वप्नीका गंभीर जखमी झाली होती.
-
ख्वाजा युनूस प्रकरण: मुंबईत घाटकोपर येथील बॉम्बस्फोटातील सहभागावरुन मुंबई पोलिसांनी मुळचा परभणीचा रहिवासी असलेल्या ख्वाजा युनूसला दुबईवरुन मुंबईत परतताना २५ डिसेंबर २००२ साली अटक केली होती. २००४ साली चौकशीदरम्यान ख्वाजा युनूसला घेऊन जात असताना नगरच्या पारनेरजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात झाला होता. यावेळी ख्वाजा युनूस संधीचा फायदा उचलत पळून गेला असा जबाब क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवला होता. मात्र युनूसच्या मित्राने पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर तो दिसला नाही असं म्हटलं होतं.
-
पोलीस कस्टडीत छळ केल्यामुळे ख्वाजा युनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर केला होता. या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यामुळे चारही पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाने बडतर्फ केलं होतं. ख्वाजा युनूस प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने वाझे यांच्यासह तीन पोलीस शिपायांविरोधात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दोषारोपपत्र ठेवले होते. जवळजवळ १६ वर्षानंतर नुकतचं या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार, सचिन वाझे, राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”