-
ठाणे येथील ग्लोबल हब कोवीड रुग्णालयाला जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान शिंदे यांनी थेट पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट कीट) घालून करोना रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची विचारपूस केली. यासंदर्भातील फोटो शिंदे यांनीच आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरुन पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो: Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे फेसबुक अकाउंटवरुन)
-
पहाणीसाठी रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी करोनाबाधितांच्या वॉर्डमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि थेट पीपीई कीट घातलं.
-
"अचानक ठाणे येथील ग्लोबल हब कोवीड रुग्णालया भेट देऊन रूग्ण, डाॅक्टर, परिचारिका भगिनी तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची विचारपूस करून त्यांच्या सेवेप्रती आदर व्यक्त करून त्यांचे मनोधैर्य उंचावले," असं शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
ठाणे येथील ग्लोबल हब कोवीड रुग्णालयातील रुग्णांना ठाणे शिवसेनेच्या वतीने उद्यापासून दूध, अंडी आणि फळे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली आहे.
-
ठाणे येथील ग्लोबल हब कोवीड रुग्णालया दिलेल्या या भेटीदरम्यान शिंदे यांनी डायलिसिस, आयसीयू, ॲाक्सीजन आणि नाॅन ॲाक्सीजन वार्ड्सना भेट देत तेथील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली.
-
रुग्णांना वेळेवर व्यवस्थित जेवण मिळते का? औषधे दिली जातात का? काही अडचण आहे का? याबाबत पालकमंत्र्यांनी चौकशी केली.
-
रुग्णांशी संवाद साधताना घाबरू नका, काळजी घ्या आणि लवकर बरे व्हाल असा विश्वास व्यक्त करत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
शिंदे यांनी रुग्णांबरोबरच डाॅक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशीही संवाद साधून स्वत:ची काळजी घेण्याबाबत सूचना करत त्यांच्या कामाचे कौतुक केलं.
-
शिंदे यांनी या भेटीत रुग्णांना गरम पाणी मिळते का?, तसेच शौचालये आणि बाथरूम साफ आहेत का? यासारख्या लहान लहान गोष्टींची पाहणी केली.
-
शिंदे यांच्या या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत उपायुक्त विश्वनाथ केळकर, संदीप माळवी आणि डाॅक्टर्स उपस्थित होते.
-
शिंदे यांनीच हे सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”