-
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात एक प्रकारची राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
राजस्थानातील सद्य राजकीय स्थितीची मध्य प्रदेश, कर्नाटक बरोबर तुलना केली जात आहे. या दोन राज्यातही काँग्रेसची सरकारे होती. पण मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंची बंडखोरी आणि कर्नाटकात आमदारांची बंडखोरी यामुळे तिथली काँग्रेसची सरकारे कोसळली. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
संग्रहित
-
कर्नाटक, मध्य प्रदेशात भाजपा बहुमतापासून फार लांब नव्हते. पण राजस्थानात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला मोठया प्रमाणावर आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. आकडयांची ही जमवाजमव करणे इतके सोपे नाहीय. सचिन पायलट यांनी त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचा दावा केला आहे.
-
काँग्रेसचे निवडून आलेले १०७ आमदार आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे. भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आणि आरएलडीच्या एका आमदाराचा गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. म्हणजे १२२ ते १२३ आमदार गेहलोत यांच्यासोबत आहेत.
-
कठिण परिस्थितीत त्यांना सीपीएमच्या दोन आमदारांचाही पाठिंबा मिळू शकते. म्हणजे संख्याबळ झाले १२५.
-
सचिन पायलट यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तरी त्यांना कसे सामावून घ्यायचे हा सुद्धा भाजपासमोर एक मोठा प्रश्न असेल. कारण वसुंधरा राजे यांचा राजस्थान भाजपामध्ये दबदबा आहे.
-
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांना १२३ सदस्यांनी मतदान केले होते.
-
दुसऱ्या बाजूला भाजपाकडे ७० आमदार आहेत. त्याशिवाय नागौरचे खासदार हनुमान प्रसाद बेनिवाल यांचा पाठिंबा आहे. त्यांचे तीन आमदारही भाजपासोबत आहेत.
-
२०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत बहुमतासाठी १०१ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. आज काँग्रेसकडे १२२ तर भाजपाकडे ७५ सदस्य आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, कर्नाटक प्रमाणे राजस्थानात सत्ता पालट होणे इतके सोपे नाही. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे हे शक्य झाले.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”