-
चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तेथील तब्बल ३३ नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. इतिहास पहिल्यांद एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी एवढ्या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत असल्याचे चीनच्या जलसंपदा मंत्रालयातील सहाय्यक मंत्र्याने सोमवारी सांगितलं. (सर्व फोटो साभार: Twitter/PDChina)
-
चीनमधील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असून मागील संपूर्ण आठवडा अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
-
जलसंपदा विभागाचे उपमंत्री यी चीयानचान यांनी देशातील ४३३ नद्या आणि तलावांमधील पाणी पातळीसंदर्भातील माहिती प्रसारमाद्यमांना दिली. देशातील केवळ नद्याच नाही तर डाँगटींग, पोयांग आणि ताय या तीन मोठ्या तलांवमधील पाण्याची पातळीही धोक्याच्या पातळीहून अधिक असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
-
जून महिन्यापासून देशातील ४३३ नद्या मागील दीड महिन्याच्या कालावधीमध्ये धोक्याच्या पातळी ओलांडून गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
-
"एकंदरित परिस्थिती पाहिली तर जुलैच्या मध्यपासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत यांगत्से आणि ताय तलाव परिसरामध्ये भीषण पूर येण्याची शक्यता आहे. मध्य चीनमधील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर आता उत्तरेकडील भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे," असं जलसंपदा विभागाचे उपमंत्री यी चीयानचान यांनी सांगितलं.
-
१९६१ पासून पावसाची नोंद चीनमध्ये ठेवली जाते. तेव्हापासून आतापर्यंतच्या जवळजवळ ६० वर्षांच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एवढा पाऊस चीनमध्ये पडला आहे.
-
पुरामुळे देशामध्ये १४१ जणांचा मृत्यू झाला किंवा हरवल्याची माहिती आपत्कालीन मंत्रालयाने शुक्रवारी दिली होती. तर यामुळे एकूण ८.५७ बीलीयन डॉलर्सचं (म्हणजेच अंदाजे ६४ हजार ४४२ कोटींचं) नुकसान झालं आहे.
-
यांगत्सेच्या खोऱ्यातील आपत्कालीन यंत्रणांनी रेड अलर्ट जारी केला आहे. यांगत्सेच्या खोऱ्यामध्येच मध्य चीनमधील मोठ्या लोकसंख्येचे वास्तव्य आहे. झियनिंगिंग, जिउजियांग आणि नांचांग यासारख्या मोठ्या शहरांचाही पूर येण्याची शक्यता असणाऱ्या प्रदेशांमध्ये समावेश आहे.
-
पोयांग तलाव परिसरामध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये नेहमीच्या पातळीपेक्षा पाण्याची पातळी तीन मीटरने अधिक आहे.
-
चीनच्या अनेक अनेक भागांमध्ये सैन्याची मदत घेण्यात आली आहे.
-
नदीच्या काठांवर वाळूच्या गोणींच्या मदतीने बंधारे बांधून पूराचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न काही भागांमध्ये करण्यात येत आहे.
-
वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बोटींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.
-
अनेक शहरांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे.
-
धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
-
चीनमधील हवामान खात्याने मध्य आणि उत्तर चीनमध्ये अशाप्रकारचा पाऊस काही दिवस सुरुच राहणार असून वादळाचीही शक्यता व्यक्त केली आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”