राजस्थानमध्ये गेहलोत सरकार अडचणीत आलंय त्याचं मुख्य कारण आहेत सचिन पायलट.. त्यांचे वडील राजेश पायलटही काँग्रेसमध्ये होते. सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. जाणून घेऊया सचिन पायलट यांच्याविषयी (सर्व फोटो सौजन्य- इंस्टाग्राम अकाऊंट-सचिन पायलट) -
सचिन पायलट हे काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९७७ चा. एक आक्रमक पण तेवढेच संयमी राजकारणी अशी त्यांची ओळख
-
राजस्थानची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सचिन पायलटच राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती.. मात्र अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले आणि सचिन पायलट उपमुख्यमंत्री. गेल्या दोन दिवसात जो राजकीय धुरळा राजस्थानात उडाला त्याची सुरुवात इथेच झाली होती.
-
सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे.. हे दोन तरुण तडफदार नेते काँग्रेसचे उत्तम चेहरे. ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपात प्रवेश केला. आता सचिन पायलट काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे
-
२००२ पासून सचिन पायलट हे काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. १० ऑक्टोबर २००२ हा राजेश पायलट यांचा जन्मदिवस होता त्याच दिवशी सचिन पायलट काँग्रेसमध्ये प्रवेश केला
-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत सचिन पायलट
-
एका रिलॅक्स मूडमध्ये क्रिकेटचा आनंद लुटताना सचिन पायलट
-
२००४ मध्ये सचिन पायलट यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या मुलीशी विवाह केला
-
मार्च २००४ मध्ये १४ व्या लोकसभेसाठी राजस्थानच्या दौसा मतदार संघातून १ लाखांपेक्षा जास्त मतं घेत ते निवडून आले. वयाच्या २६ व्या वर्षी निवडून आलेले ते सर्वात कमी वयाचे खासदार ठरले
-
सचिन पायलट यांचे वडिल राजेश पायलट हे केंद्रीय मंत्री होते
-
२००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत राजेश पायलट यांनी भाजपाच्या किरण माहेश्वरींचा ७६ हजार मतांनी पराभव केला
-
मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजेच यूपीए २ मध्ये सचिन पायलट हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री होते
-
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासोबत सचिन पायलट
-
काँग्रेसच्या प्रचारातला एक समाधानाचा क्षण
-
२०१४ मध्ये राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून सचिन पायलट यांची नियुक्ती
-
प्रचारसभेतला सचिन पायलट यांचा आक्रमक अंदाज
-
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत युनूस खान यांचा पराभव करुन ५४ हजार १७९ मतांनी सचिन पायलट टोंक मतदारसंघातून विजयी झाले
-
डिसेंबर २०१८ मध्ये राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली
-
निवडणूक प्रचारादरम्यानचा एक निवांत क्षण
-
काँग्रेसमध्ये आक्रमकपणे पुढे चालणारे पण तेवढेच शांत आणि संयमी असणारे सचिन पायलट यांनी आता पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे
-
सचिन पायलट यांनी भाजपात गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची नुकतीच भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या
-
सचिन पायलट आता काय भूमिका घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
-
सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा उभारल्याने राजस्थान सरकार अस्थिर झालं आहे.
-
सचिन पायलट आता काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे
-
सचिन पायलट यांनी त्यांच्यासोबत २५ आमदार असल्याचा दावा केला आहे

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”