-
चीन आणि तैवानमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर दुसरीकडे चीननं अनेकदा तैवानला युद्धाचीही धमकी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यानच तैवाननं चीनच्या दुखत्या नसेवर हात ठेवला आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
दरम्यान, तैवाननं तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर त्यांना तैवानमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं तैवाननं म्हटलं आहे. तैवानच्या या निर्णयामुळे चीनला मिर्च्या झोंबण्याची शक्यता आहे.
-
दलाई लामा यांनी जर विनंती केली तर नियमानुसार त्यांच्या भेटीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
-
बौद्ध शिक्षणाच्या प्रसारासाठी आमचा देश पुन्हा एकदा दलाई लामा यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहे, असं तैवानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जोआने ओयू यांनी म्हटलं आहे. २००९ मध्ये दलाई लामा यांनी अखेरचा तैवानचा दौरा केला होता.
-
आपल्या वाढदिवसाच्या दिनी दलाई लामा यांनी तैवानमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
-
चीन कायमच दलाई लामा यांना फुटीरतावादी नेता मानत आला आहे. त्यामुळे त्यांच्या तैवान दौऱ्याचा चीनकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन तैवानला आपलाच भूभाग मानतो. तर दुसरीकडे तैवाननं आपण लोकशाही आणि स्वतंत्र देश असल्याची घोषणाही केली आहे.
-
चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा चीनची फायटर जेट तैवानच्या सीमाभागत घुसली होती. त्यानंतर तैवाननं चीनला इशारा दिला होता. १० दिवसांमध्ये ५ वेळा चीनच्या हवाई दलानं तैवानच्या हवाई सीमेचं उल्लंघन केलं होतं.
-
तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग वेन यांच्या शपथविधीदरम्यान भाजपाचे खासदार मिनाक्षी लेखी आणि कस्वान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावरही चीननं आक्षेप घेतला होता.
-
काही दिवसांपूर्वी चीन आणि भारतादरम्यान असलेल्या ताबा रेषेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यानंतर एक फोटो व्हायरल होता. प्रभू श्रीराम यांनी चीनच्या ड्रॅगनला मारण्यासाठी हाती धनुष्य घेतल्याचं यात दाखवण्यात आलं होतं.
-
हा फोटो हाँगकाँगची सोशल मीडिया साईट LIHKG ने शेअर केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल झाला होता.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”