-
अनेकदा पोलीस चोरांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. अनेकदा काही पोलीस यामध्ये यशस्वी होतात तर काहीजण स्वत:चं हसं करुन घेतात. बिहारमधील पोलिसांनाही नुकतीच अशी एक कल्पना वापरली. फरार आरोपीच्या घरी नोटीस लावण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी स्वत:बरोबर चक्क बॅण्डवाल्यांना नेलं होतं.
-
बिहारमधील भागलपूर पोलिसांनी अशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आरोपींना नोटीस जारी केली आहे. आरोपींनी शरण यावं असं सांगण्यासाठी पोलीस बॅण्ड बाजासहीत आरोपीच्या घरी दाखल झाले. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
-
अनेक प्रकरणांमध्ये पोलीस शोध घेत असलेले आरोपी तुमच्याच आजूबाजूला राहतात हे शेजाऱ्यांना कळावं म्हणून पोलीस एवढ्या लवाजम्यासहीत त्याच्या घरी पोहचले. अगदी वाजत गाजत पोलीस या आरोपांच्या घरी पोहचले आणि दारांवर नोटीस लावली. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबियांनाही समज दिली असून आरोपींना लवकर शरण येण्यास सांगावे असा इशारा दिला आहे.
-
"दिलेल्या वेळामध्ये तुमच्या घरातील व्यक्तीने पोलिसांना शरण यावं असं आम्ही कुटुंबियांना सांगून आलो आहोत. तर ते वेळीच शरण आले नाहीतर तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. त्यांची संपत्तीही जप्त करण्यात येईल असं आम्ही कुटुंबियांना सांगून आलो आहोत," अशी माहिती भागलपूर पोलिसांचे प्रमुख पवन कुमार यांनी दिली आहे.
-
स्टेशन हाऊस ऑफिसर असणारे पवन कुमार हे बँण्डसहीत आरोपी राहुलच्या घरी पोहचले आणि नोटीस चिटकवून आले. तर बाबरगंज पोलीस स्थानकातील चंदन यादवच्या घरी अशाच पद्धतीने वाजत गाजत नोटीस चिटवकून आले.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”