-
देशातील पहिल्या पाचमधील माहिती तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या अध्यक्षपदी संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर-मलहोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (फोटो – शिव नाडर फाऊंडेशन)
-
८.९ अब्ज डॉलरच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध तंत्रज्ञान कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या रोशनी या पहिल्या महिला ठरल्या आहेत. (फोटो – शिव नाडर फाऊंडेशन)
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्जाधीश, तरुण उद्योजक, महिला व्यावसायिकांच्या यादीत त्यांची अव्वल म्हणून नोंद झाली आहे. (फोटो – शिव नाडर फाऊंडेशन)
-
शिव नाडर हे या पदावरून पायउतार होत असून रोशनी यांच्याकडे एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार कायम राहणार आहे. (फोटो – शिव नाडर फाऊंडेशन)
-
९.९ अब्ज डॉलरच्या एचसीएल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत एचसीएल टेक्नॉलॉजिजसह एचसीएल इन्फोसिस्टिम्स, एचसीएल हेल्थके अर आदी व्यवसाय कंपन्या आहेत. (फोटो – शिव नाडर फाऊंडेशन)
-
प्रसार माध्यमांमध्ये विशेष रुची असलेल्या शिव यांच्या कन्या रोशनी या एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या संचालक मंडळात सर्वप्रथम २०१३ मध्ये रुजू झाल्या. येथे त्यांनी उपाध्यक्षपदाची भूमिकाही बजाविली.
-
एचसीएल समूहात येण्यापूर्वी त्यांनी सीएनएनसारख्या इंग्रजी वाहिन्यांमध्ये वृत्त निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडली.
-
एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाची माळ त्यांच्या गळ्यात वयाच्या २७ व्या वर्षीच पडली. ४० वर्षांच्या आतील युवा उद्योजक म्हणून त्या फोर्ब्ससारख्या यादीत त्या झळकल्या आहेत.
-
रोशनी या आतापर्यंत अध्यक्ष म्हणून काम करत नसल्या तरी त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचं म्हटलं जातं.
-
त्यांनी २०१० मध्ये शिखर मल्होत्रा यांच्या लग्नगाठ बांधली. शिखर मल्होत्रा हे एचसीएलच्या हेल्थ केअरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
जगातील सर्वात श्रीमंत १०० महिलांच्या यादीतही त्यांचं नाव आहे. २०१९ मध्ये त्या या यादीत ५४ व्या स्थानावर होत्या.
-
२०१९ मध्ये त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या.
-
IIFL Wealth Hurun India च्या माहितीनुसार त्यांचं नेटवर्थ ३१ हजार ४०० कोटी रूपये आहे.
-
रोशनी नाडर यांना वाईल्ड लाईफची फार आवड आहे. दरवर्षी त्या वाईल्डलाईफ सफारीवरदेखील जात असतात.
-
गेली अनेक वर्षे एचसीएल फाऊंडेशनच्या मदतीनं त्या सामाजित कार्यातदेखील उतरल्या आहेत. (फोटो – शिव नाडर फाऊंडेशन)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”