-
एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक अशा अनेक बँकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तुमच्यापैकी अनेकांची या बँकांमध्ये खातीही असतील. मात्र सामन्यपणे आपलं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेचा बँक मॅनेजर आणि कॅशियर सोडला तर सामान्यांचा कधी बँकेच्या अधिकाऱ्यांशी थेट संबंध येत नाही. मात्र या बँकेच्या अधिकाऱ्यांचा रुबाब पाहता क्षणी डोळ्यात भरतो. भारतातील अव्वल खासगी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पगाराची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. त्यावरच टाकलेली ही नजर…
-
सर्वाधिक पगार घेणाऱ्या एमडी आणि सीईओंमध्ये अव्वल चारपैकी सर्वात तळाला आहेत ते कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या उदय कोटक. उदय कोटक यांच्या वेतनामध्ये मोठी कपात झाली आहे. या बँकेमधील २६ टक्के भागेदारी ही उदय कोटक यांची आहे. २०२० साली उदय कोटक यांना २ कोटी ९७ लाख रुपये वेतन म्हणून देण्यात आलं.
-
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी उदय यांना देण्यात आलेलं वेतन हे १८ टक्क्यांनी कमी आहे. २०१९ मध्ये त्यांना वेतन म्हणून एकूण ३ कोटी ५२ लाख रुपये देण्यात आले होते.
-
सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओ आणि एमडीच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत अॅक्सिस बँकचे अमिताभ चौधरी. अॅक्सिस बँक देशातील खासगी बँकांपैकी एक मोठी बँक आहे. यामध्ये ७२,००० कर्मचारी काम करतात.
-
अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अमिताभ चौधरी. अमिताभ यांना २०२० मध्ये वेतन म्हणून ६ कोटी १ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याआदी म्हणजेच २०१९ च्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये त्यांना पगार म्हणून १ कोटी २७ लाख रुपये देण्यात आले होते.
-
अॅक्सिस बँकचे रिटेल हेड प्रलय मंडल यांना २०२० मध्ये १ कोटी ८३ लाख रुपये वेतन म्हणून देण्यात आले आहेत. नुकताच प्रलय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एचडीएफसी आणि यस बँकसारख्या मोठ्या बँकांमध्ये काम करणाऱ्या प्रयल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती सीएसबी बँकेच्या प्रमुखपदी होण्याची शक्यता काही वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी व्यक्त केली आहे.
-
देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या आयसीआयसीआयचे एमडी आणि सीईओ असणाऱ्या संदीप बख्शी यांचा सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो. आयसीआयसीआय बँक ही एचडीएफसी खालोखाल देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक आहे. आयसीआयसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या संदीप बख्शी यांना २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये ६ कोटी ३१ लाख रुपये पगार मिळाला होता. आयसीआयसीआयने आपल्या वर्षिक अहवालामध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.
-
संदीप बख्शी यांना २०१८ साली ऑक्टोबर महिन्यामध्ये आयसीआयसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्यानंतरच्या पहिल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१८-२०१९ मध्ये त्यांना ४ कोटी ९० लाख रुपये पगार म्हणून देण्यात आले होते.
-
आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्यांमध्ये एचडीएफसी बँकचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांचे नाव अग्रस्थानी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात पुरी यांना पगार आणि संचालक म्हणून देण्यात येणाऱ्या इतर निधीमध्ये एकूण ३८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात पुरी यांनी १८ कोटी ९२ लाख रुपये पगार मिळाला आहे.
-
संपत्तीच्या बाबतीत एडचीएफसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. या बँकेला सध्याच्या यशाच्या शिखरावर नेण्यामध्ये पुरी यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांबद्दल बोलतायेच झाल्यास मागील २५ वर्षांपासून गुंतवणूकदारांनाही आकर्षित करणारी एचडीएफसी ही एक अव्वल बँक ठरली आहे. एचडीएफसीने बँकने आपल्या वार्षिक अहवालामध्ये मागील आर्थिक वर्षात पुरी यांनी बँकेतील स्टॉक ऑप्शन्स फायदा घेत १६१.५६ कोटी रुपये कमावले आहेत.
-
आदित्य पुरी या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये निवृत्त होणार आहोत. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये स्टॉक ऑप्शन्सचा फयादा घेत त्यांनी ४२ हजार २० कोटी रुपये कमवले होते. बँकेच्या अहवालानुसार एचडीएफसीचे ग्रुप हेड सशिधर जगदीशन यांना २०१९-२० मध्ये २.९१ कोटी रुपये पगार म्हणून देण्यात आला आहे. पुरी यांच्यानंतर जगदीशन यांच्याकडेच एचडीएफसीच्या संचालकपदाची सुत्रे जाणार असल्याची चर्चा सध्या बँकिंग वर्तुळामध्ये आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”