-
भारत आणि चीनदरम्यान वाढत असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने लवकरच आम्ही भारतीय नौसेनेला लवकरच एमएच-६० रोमियो हेलिकॉप्टर देणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण चीनच्या सुमद्रामध्ये बिजिंगकडून मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असल्याने अमेरिकला चीनविरोधात मदत करणाऱ्या देशांमध्ये भारताचे नाव आघाडीवर असल्याचे अमेरिकन सुरक्षातज्ज्ञांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका पाणबुड्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असणारी एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर भारताला देणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली तुकडी २०२१ च्या सुरुवातील भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे समजते. (Photo : Twitter/lindareynoldswa)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर बनवणाऱ्या लॉकहीड मार्टिनचे अधिकारी विलियम ब्लेयर यांनी द ट्रिब्यूनशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. इतर देशांना विकण्यात येणाऱ्या युद्ध सामुग्रीच्या कराराप्रमाणे ही विक्री केली जाणार असल्याचे ब्लेयर यांनी म्हटलं आहे. (Photo : wikimedia commons)
-
लवकरात लवकर भारताला ही हेलिकॉप्टर देण्यासंदर्भात अमेरिकेचे काम सुरु आहे. लवकरच आम्ही या हेलिकॉप्टरची निर्मिती पूर्ण करुन आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही भारताच्या ताब्यात देऊ असा विश्वास ब्लेयर यांनी व्यक्त केला आहे. (Photo : wikimedia commons)
-
भारत अमेरिकेकडून २४ एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर घेणार असल्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. हिंदी महासागरात चिनी पाणबुड्यांचा वावर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर हा करार आणि २४ एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टरचा भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये होणारा समावेश महत्वाचा मानला जात आहे. (Photo : Twitter/lindareynoldswa)
-
भारताला चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही हेलिकॉप्टर्स भारताला लवकरात लवकर देण्याचा अमेरिकेचा विचार आहे का?, असा प्रश्न ब्लेयर यांनी विचारण्यात आला. "आम्हालाच लवकरात लवकर ही हेलिकॉप्टर भारताला द्यायची आहेत. फेब्रुवारीमध्ये यासंदर्भातील करार झाला होता. विक्रमी वेळेत आम्ही हेलिकॉप्टर्स भारताला देण्याचा प्रयत्न करत आहोत," असं ब्लेयर म्हणाले. (Photo : wikimedia commons)
-
कसे आहे एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर?: लॉकहीड मार्टिनची निर्मिती असणारे एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर हे सी हॉक प्रकारातील आहे. हे हेलिकॉप्टर पाणबुड्या आणि युद्ध जहाजांवर अचूक निशाणा साधण्यासाठी ओळखले जाते. हे हेलिकॉप्टर समुद्रामध्ये एखादी शोधमोहीम राबवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी फायद्याचे ठरते. (Photo : wikimedia commons)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर हे शत्रूच्या मोठ्या जहाजांचा माग काढू शकते. या जहाजांवर हल्ला करण्यासाठी हेलिकॉप्टरवर सेंसर्स, मिसाइल आणि टोरपीडो यासारखे आधुनिक तंत्रज्ञान आहे. (Photo : wikimedia commons)
-
भारताला हे हेलिकॉप्टर देण्यात येणार असेल तर त्यामध्ये जास्त क्षमतेचे इंजिन, खास क्षेपणास्त्र आणि एमके ५४ टोरपीडो यासारख्या तंत्रज्ञानाची यामध्ये गरज आहे. (Photo : Tweet/hukum2082)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर अमेरिकन नौदलामध्ये अॅण्टी सबमरीन म्हणजेच पाणबुड्यांविरोधात कारवाया करण्यासाठी आणि अॅण्टी सरफेस वेपन म्हणजेच जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरले जाते. (Photo : Twitter/lindareynoldswa)
-
आकाराने जहाज आणि पाणबुड्यांपेक्षा हे छोटेसे वाटणारे हेलिकॉप्टर समुद्रामध्ये युद्धाच्यावेळी खूपच घातक ठरु शकते. अॅण्टी सबमरीन हेलिकॉप्टर म्हणून ओळख असणारे हे हेलिकॉप्टर सोनार तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणबुड्यांचा अंदाजही व्यक्त करु शकते. त्यामुळेच याचे महत्व अनेक पटींनी वाढते. (Photo : wikimedia commons)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टर भारतीय सुरक्षा दलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरतील. खास करुन पाण्यावर आणि पाण्याखालील शत्रूच्या हलचालींचा वेध घेण्यासाठी या हेलिकॉप्टर्सची मदत घेता येईल. (Photo : wikimedia commons)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टरमध्ये दुहेरी नियंत्रण प्रणाली आहे. यामुळे या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट असतात. या हेलिकॉप्टरच्या कॉकपीटमध्ये बसलेल्या पायलटला रात्रीच्या घनदाट अंधारामध्येही स्पष्टपणे दिसू शकते अशी यंत्रणा आहे. (Photo : wikimedia commons)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टरमध्ये चार ते पाच केबिन क्रूबरोबरच पाच प्रवासी एकाच वेळी बसू शकतात. या हेलिकॉप्टरच्या केबिनची लांबी ३.२ मीटर तर रुंदी १.८ मीटर इतकी आहे. केबिनची उंची १.३ मीटर इतकी आहे. (Photo : wikimedia commons)
-
एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हत्याचे आहेत. ही हत्यारे लावण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये विशेष सोय देण्यात आली आहे. यामध्ये लॉकहीड मार्टिनचे एजीएम-१४४ हेलफायर या अॅण्टी सर्फेस क्षेपणास्त्राचा वापर करता येईल. (Photo : wikimedia commons)
-
पाणबुड्यांचा वेध घेण्यासाठी एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टरमध्ये एमकेटी एमके ५० किंवा एमके ४६ आहेत. हे दोन्ही अॅक्टीव्ह किंवा पॅसिव्ह टॉरपीडोच्या मदतीने डागता येतात. या हेलिकॉप्टरमध्ये ७.६२ एमएमची मशीनगनही लावता येते. (Photo : wikimedia commons)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”