-
गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून देशाच्या करोनाविरोधातील लढय़ाची सूत्रे हलविणारे केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रमुख अमित शाह यांना संसर्ग झाला आहे. त्यांना रविवारी गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसर्ग झाल्याची माहिती शाह यांनी ट्वीट करून दिली.
-
‘‘करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी चाचणी करून घेतली. त्यातून मी करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात जावे आणि चाचणी करून घ्यावी,’’ असे ट्वीट शाह यांनी केले.
-
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ‘वेबिनार’मध्ये शाह सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीला शाह उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी आदी वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. याच बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला मान्यता देण्यात आली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये योग्य अंतर राखूनच मंत्र्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय, पंतप्रधान मोदी मुखपट्टी वापरतात.
-
दिल्लीमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर शाह यांनी दिल्लीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियमित बैठक घेतली होती. लोकनायक रुग्णालय तसेच, नव्या करोना आरोग्यसेवा केंद्रांनाही शहा यांनी भेट दिली होती. शुक्रवारी शहा यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांची भेट घेतली होती.
-
राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्याअंतर्गत करोनासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहे. गृहमंत्री या नात्याने शाह सातत्याने बठका घेत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी वर्गही त्यांच्या संपर्कात आलेला आहे. त्यांनाही चाचणी करावी लागणार असून विलगीकरणात जावे लागणार आहे. मात्र शाह यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर भाजपाच्या तीन बड्या नेत्यांनी सेल्फ आयसोलेनशन म्हणजेच विलगीकरणात जाण्याचा निर्णय स्वत:हून घेतला आहे. याच नेत्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आपण खबरदारीचा उपाय म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये जात असल्याचे ट्विटवरुन सांगितलं आहे.
-
माझी प्रकृती अगदी उत्तम आहे. मात्र नियमांनुसार मी काही दिवसांसाठी माझ्या घरी सेल्फ आयसोलेशनमध्ये जात आहे. शनिवारी (१ ऑगस्ट २०२०) मी अमित शाह यांची भेट घेतली होती. मी सध्या घरुनच काम करत असून सर्व नियमांचे पालन करत आहे. तसेच मी रोज योगा आणि व्यायामही करत आहे. त्याचप्रमाणे मी रोज पुस्तके वाचत असून शास्त्रीय संगिताचा आनंदही घेत आहे, असं रवि शंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे.
-
केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनाही स्वत:ला आयसोलेट केलं आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
-
मी काही दिवसांपूर्वी अमित शाह यांना भेटलो होतो. मला डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांपासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांमध्ये यासंदर्भातील चाचण्या केल्या जातील. मी सर्व नियमांचे पालन करत आयसोलेशनमध्ये जात आहे, असं सुप्रियो यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धेही यांनी स्वत: हून गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
-
लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दीनिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शनिवारी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका व्यासपीठावर होते. त्यामुळे सहस्रबुद्धे विलगिकरणामध्ये गेले आहेत. (फाइल फोटो)
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे.
-
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे. (ट्विटचे स्क्रीनशॉर्ट वगळता गॅलरीमधील सर्व फोटो प्रातिनिधिक अथवा फाइल फोटो आहेत)
-
संग्रहित छायाचित्र
-
“माझ्यात करोनाची लक्षणं दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांची करोना टेस्ट करुन घ्यावी, तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्यावे” असे आवाहन शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटवरुन केलं होतं. सध्या शिवराज यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात