-
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ५ ऑगस्टला होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. असं असलं तरी या ठिकाणावरील कामाला मे महिन्यापासूनच सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या मजुरांच्या मदतीने अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू आहे. या ठिकाणी जागेचं सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले आहेत. देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचे अवशेष सापडले आहे. नक्की या ठिकाणी काय सापडलं आहे याचसंदर्भात आपण फोटोगॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात येणाऱ्या नियोजित ठिकाणी जागेचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू झाल्यानंतर यासाठी खोदकामही करण्यात आलं. या खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
१० मे रोजी या ठिकाणी कामाला सुरुवात झाल्यानंतर २१ मे रोजी सपाटीकरणादरम्यान काही वस्तू सापडल्या. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी २१ मे रोजी बोलताना सांगितलं होतं. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
"मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे,” अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली २१ मे रोजी दिली होती. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी आयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारनं न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं काम सुरू केलं आहे. याच कामादरम्यान या वस्तू सापडल्या. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
सपाटीकरणादरम्यान सापडलेल्या या खांबावर नक्षीकाम स्पष्टपणे दिसून येत आहे. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
सापडलेल्या एकूण स्तंभांपैकी सात ब्लॅक टच स्टोनपासून तयार केलेले आहेत. तर सहा खांब हे रेड सॅण्डस्टोनपासून तयार केलेले आहेत. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
अनेक मोठ्या आकाराचे खांबही या कामादरम्यान सापडले. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
अनेक थांबांवर असे नाजूक नक्षीकाम आढळून आलं आहे. (Photo: Twitter/ShriRamTeert)
-
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुनही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. (Photo: Twitter/ShriRamTeert)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात