-
अयोध्येतील भव्यदिव्य अशा राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
-
दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदी, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला.
-
करोनाचे संकट लक्षात घेता या सोहळ्याला मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती.
-
इतर नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी घरीच हा सोहळा साजरा केला.
-
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी परिवारासह प्रभू रामचंद्राचे स्तोत्रपठण केले.
-
करोनाच्या प्रादुर्भावाच्या धोक्यामुळे मूळ कार्यक्रमाला जाणे त्यांना शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी घरातच रामनामाचा जप व आरती केली.
-
गडकरी यांच्या घरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले.
-
त्यानंतर गडकरी यांनी प्रभू रामचंद्राच्या चरणी साष्टांग दंडवतदेखील घातला.
-
नितीन गडकरी यांची नातवंडं यावेळी हातात आरतीची थाळी घेऊन मनोभावे प्रभू रामचंद्राचे नामस्मरण करताना दिसले.
-
गडकरी यांच्या कुटुंबातील साऱ्यांनी आरती आणि जप करत श्रीरामाचे स्मरण केले.
-
देशातच नव्हे तर जगात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रभू श्रीरामचंद्र यांचे पूजन आणि जयघोष करण्यात आला.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”