-
जगभरता करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, जगभरातील करोनाबाधितांची संख्या आता २ कोटींवर पोहोचली होती. एकीकडे ही चिंताजनक बाब असली तरी दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचा एका वक्तव्यामुळे दिलासा मिळाला आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
जागतिक आरोग्य संघटनेतं हे वक्तव्य अशावेळी समोर आलं आहे जेव्हा जगातील करोनाबाधितांच्या संख्येनं २ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आतापर्यंत ७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
-
"सर्व लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. परंतु संपूर्ण जगासाठीच हा कठिण काळ आहे. एका गोष्टीची उमेद कायम आहे, ती म्हणजे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास उशिर झालेला नाही. अजूनही करोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो," असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेडरस अधनोम यांनी व्यक्त केलं. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.
-
"आग्नेय आशियातील देश, न्यूझीलंड, रवांडा, कॅरेबियन आणि अन्य काही देशांमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. इतकंच काय तर फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, स्पेन, इटली आणि ब्रिटनसारख्या देशांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला होता," असंही ते म्हणाले.
-
त्या त्या देशांमधील सरकारकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळेच अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे ते म्हणाले. घरात राहणं, मास्क परिधान करणं अशी अनेक पावलं उचलली गेली असल्याचंही टेडरस अधनोम यांनी सांगितलं. जॉन हॉपकिंसच्या एका अहवालानुसार करोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे.
-
अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्येनं ५० लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यापैकी १ लाख ६२ हजार जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. अधिक चाचण्या होत असल्यामुळे अमेरिकेत करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या दिसत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
-
परंतु जाणकारांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकेत सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहे. त्यानंतर भारतात सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्याचं ते म्हणाले होते.
-
अमेरिकेत अशी काही राज्ये आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे किंवा त्यांचा मृत्यूही झाला आहे, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १ लाख ६२ हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
-
'द इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एव्हल्यूशन'नेदेखील रुग्णालयांमधील बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली होती. शुक्रवारी न्यूयॉर्कच्या गव्हर्नरनंदेखील लॉकडाउननंतर शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती.
-
"आम्हाला सर्व शाळा पुन्हा सुरू झालेल्या पाहायच्या आहेत. परंतु विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे," असं टेडरस म्हणाले होते.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात