-
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. मात्र, या दाव्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
"करोनावरील जगातील पहिल्या लसीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते", असं पुतिन यांनी जाहीर केलं.
-
आपल्या मुलीला ही लच टोचण्यात आली असून, तिला बरं वाटत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. ‘स्पुटनिक व्ही’ असं या लसीचं नाव आहे.
-
ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल. लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल. सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.
-
१८ जूनला रशियन लशीच्या चाचण्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला ती ३८ जणांना टोचण्यात आली. या सर्वामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली. ही लस १ जानेवारी २०२१ पासून जनतेसाठी उपलब्ध होईल, असं रशियानं म्हटलं आहे.
-
वैज्ञानिकांनी या लसीबाबत धोक्याचा इशारा दिला असून परिपूर्ण चाचण्यांशिवाय ही लस वापरणे घातक असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रयोग न करताच या लसीची नोंदणी करणं चुकीचं असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
-
रशियानं उचललेलं हे पाऊल वेडेपणाचं आणि निष्काळजीपणाचं असल्याचा दावाही काही वैज्ञानिकांनी केला आहे. तसंच या लसीची योग्यरित्या चाचणी न करता ती मोठ्या प्रमाणात जनतेला देण्यात आल्यास त्याचा जनतेवर घातक परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
-
जागतिक आरोग्य संघटनेनं अद्याप रशियाच्या लसीला मंजुरी दिली नाही. परंतु २० देशांनी रशियाच्या लसीच्या कोट्यवधी डोसची ऑर्डर दिल्याचा दावाही रशियानं केला आहे.
-
"रशियानं उचललेलं पाऊस हे निष्काळजीपणाचं आणि वेडेपणाचं आहे. जर या लसीचे काही दुष्परिणाम असतील त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांवर त्याचा परिणाम जाणवेल. तसंच पुढील काळाज लसीबद्दल लोकांच्या मनात साशंकता निर्माण होईल," असं मत युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे बायोलॉजिस्ट प्राध्यापक फ्रॅकोईस बॅलूक्स यांनी व्यक्त केलं.
-
metro.co.uk च्या अहवालानुसार साऊथॅम्पटन युनिव्हर्सिटीमधील ग्लोबल हेल्थ रिसर्चर मिशेल हेड यांनी सांगितलं की, "अद्याप रशियाची लस कशी आहे हे स्पष्ट झालेलं नाही. कोणत्याही लसीचं कॅम्पेन सुरू करण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे."
-
"काही लोकांवर झालेल्या चाचणीवरून ही लस सुरक्षित आहे हे समजतं. परंतु करोनाच्या महामारीपासून ही लस बचाव करते किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांची आवश्यकता असते. जोपर्यंत रशियाकडून सायंटिफ पेपर्स प्रकाशित करण्यात येत नाही तोवर आपण याबाबत काहीही समजू शकत नाही आणि डेटा क्वालिटीसाठीही त्रास होऊ शकतो," असं नॉटिंघम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि महामारी विषयातील तज्ज्ञ कीथ नील यांनी सांगितलं.
-
"जर रशियानं तयार केलेली लस ही सुरक्षित नसेल तर भविष्यकाळात समस्या अधिक वाढतील. लसीसाठी आवश्यक नियमांचं आणि आवश्यक त्या बाबींचं योग्य पालन केलं गेलं असेल अशी आम्हाला आशा आहे," असं मत लंडनमधील इम्पेरियल कॉलेजमधील इम्यूनॉलॉजीचे प्राध्यापक डॅनी एल्टमन यांनी सांगितलं.
-
"ज्या वेगानं या लसीला मंजुरी देण्यात आली आहे त्यावरून या लसीच्या होणाऱ्या दुष्परिणामांची तपासणी सोडल्याचं वाटत आहे. लसीमध्ये दोष असल्यास विषाणू सहजरित्या मानवी शरीरात प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीला आणखी आजारी करू शकतो," असं ब्रिटनच्या वारविक स्कूलमधील ड्रग रिसर्च तज्ज्ञ आयफर अली म्हणाले.
-
करोनावरील लशीस जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवण्यासाठी कठोर चाचण्या, फेरतपासणी आवश्यक आहे, असं संघटनेनं स्पष्ट केलं. याबाबत रशियाशी संपर्कात असल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे.
-
लस तयार करताना सुरक्षेशी तडजोड करू नये. याबाबत आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा, अशी सूचना आरोग्य संघटनेनं रशियाला गेल्या आठवड्यात केली होती. चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेल्या जगभरातील सहा लसीमध्ये रशियाच्या लसीचा समावेश नाही.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”