-
खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या येस बँकेची आर्थिक स्थिती सध्या उत्तम नाही. स्टेट बँकेचे वरिष्ठ वित्तीय अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडलेल्या प्रशांत कुमार यांच्या हाती येस बँकेची सूत्रं देण्यात आली आहेत.
-
त्यांच्यावर येस बँकेला बुडण्यापासून वाचवण्याचं मोठं काम सोपवण्यात आलं आहे. बँक शेअरधारकांच्या १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत त्यांच्या वेतनावर चर्चा केली जाणार आहे.
-
येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांना २.८५ कोटी रुपयांचं पॅकेज देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
-
तसंच या सर्वसाधारण बैठकीच्या बाबतीत देण्यात आलेल्या नोटिफिकेशन द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्टॉक ऑप्शन तीन पटींनी वाढवून २२.५ कोटी करण्यावर विचार सुरू असल्यचं सांगण्यात आलं आहे.
-
स्टेट बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशांत कुमार येस बँकेशी जोडले गेले होते.
-
रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ रद्द करून नवे संचालक मंडळ नियुक्त केलं होतं.
-
बँकेची आर्थिक स्थिती उत्तम नसल्यानं बँकची सेवा घेणाऱ्या ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
-
कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बँकेनं आता १५ हजार कोटी रूपये जमवले आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी डिजिटल माध्यमातून शेअर धारकांची ही बैठक पार पडणार आहे.
-
जारी करण्यात आलेल्या नोटीसीनुसार या बैठकीत कुमार यांच्या वेतनावर चर्चा केली जाणार आहे. २६ मार्च २०२१ पर्यंत कुमार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
व्यवस्थापकीय संचालकांच्या वेतनात ४५ लाख रूपये मूळ वेतन, १.०५ कोटी रूपयांचे भत्ते आणि त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी ७२ लाख रूपयांचा समावेश आहे.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माचं फायनलमध्ये झंझावाती अर्धशतक, टीम इंडियाची दणक्यात सुरूवात