-
तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या यूपीए – २ च्या कार्यकाळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची विनंती केली होती असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते शक्ती सिंह गोहिल यांनी केला आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना पंतप्रधान बनण्यास सांगितलं होतं. परंतु ते नाकारत राहुल गांधी यांनी त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केल्याचीही ते म्हणाले.
-
"नेहरू आणि गांधी कुटुंबीयांनी कायमच मनाचा मोठेपणा दाखवला आहे. आपल्या वैयक्तीक हितांचा विचार न करता आपल्या पक्षाला आणि देशाला अधिक महत्त्व दिलं आहे, असं गोहिल म्हणाले.
-
अनेकदा गांधी कुटुंबीयांनी मोठे त्याग केले आहेत आणि कधीही त्यांना सत्तेची ओढ नव्हती," असंही गोहिल म्हणाले. ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
-
आज देशातील तरूणांना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींनीच पक्षाचं नेतृत्व करावं असं वाटतं. परंतु त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसच्या कार्यकारी समिती आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचा असल्याचाही ते म्हणाले.
-
ज्यावेळी प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यावरू चर्चा सुरू असतानाच गोहिल यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
-
गांधी कुटुंबीयांबाहेर व्यक्तीकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याला आपलं समर्थन असल्याचं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या.
-
'इंडिया टुमॉरो' या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत प्रियंका गांधी यांनी यावर भाष्य केलं होतं.
-
पक्षात असे अनेक लोकं आहेत जे पक्षाचं नेतृत्व करू शकतात, असंही त्या म्हणाल्या होत्या. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे नुकतंच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.
-
परंतु प्रियंका गांधी यांचं हे वक्तव्य एक वर्ष जुनं असून लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रियंका गांधींनी हे वक्तव्य केल्याचा दावा काँग्रेसनं केला होता.

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच