-
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच अनेक देशांमध्ये करोनाच्या लसीवर संशोधन सुरू आहे. रशियानं यापूर्वीच करोनावरील लसीला मंजुरी दिली आहे. भारतातदेखील लसीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे.
-
भारतात आजपासून ऑक्सफर्डच्या करोना लसीच्या (कोविशिल्ड) दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला सुरुवात होणार आहे.
-
ऑक्सफर्डनं भारतात आपल्या करोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे.
-
कोविशिल्डच्या सुरक्षा आणि रोग प्रतिकारशक्तीची चाचणी करण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयेमध्ये निरोगी व्यक्तींवर नियंत्रित अभ्यास केला जाईल.
-
"आम्हाला केंद्रीय नियामकाकडून आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळाल्या आहेत. तसंच आम्ही २५ ऑगस्टपासून पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयेमध्ये मानवी वैद्यकीय चाचणीला सुरूवात करणार आहे," अशी माहिती सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियामधील शासन व नियामक विषयांचे अतिरिक्त संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी दिली.
-
यापूर्वी काही माध्यमांमध्ये सिरम इन्स्टीट्यूटची ही लस ७३ दिवसांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
-
परंतु कंपनीनं या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.
-
जेव्हा यशस्वी चाचणी आणि नियामकाची मान्य़ता मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
-
'नेचर' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार माकडांवर केलेल्या चाचणीत ही लस यशस्वी ठरली आहे.
-
त्यांच्यात कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
-
जगभरातील अनेक देशांनी ऑक्सफर्डची ही लस विकत घेण्यात रुची दाखवली आहे.
-
युनायटेड किंगडमनं यासाठी १०० दशलक्ष डोससाठी करार केला आहे. तर ब्राझीलनंही १२७ दशलक्ष डॉलर्समध्ये ३० दशलक्ष डोस खरेदी करण्यासाठी करार केला आहे.
-
तर दुसरीकडे युरोपियन युनियनमधील अनेक देशही करार करण्याच्या टप्प्यात आहे. युकेमध्ये ही लस अत्यल्प दरात मिळणार असल्याचंही ऑक्सफर्डनं यापूर्वी स्पष्ट केलं आहे.
-
"देशातील एक लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सरकार सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त अन्य कंपन्यांच्यांही संपर्कात आहे आणि जास्तीत जास्त लसींची खरेदी करण्याच्या विचारात आहे," ," अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
-
"जर आयसीएमआर आणि भारत बायोटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोवॅक्सीन आणि झायडसच्या ZyCoV-D या लसी चाचणीत यशस्वी ठरल्या तर त्यांचीदेखील ऑर्ड दिली जाईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात