-
पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आजपासून ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत.
-
भारतात सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाकडून या लसीचे उत्पादन केले जात आहे. ऑक्सफर्डची ही लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली.
-
आता ही लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. हा रिपोर्टही अनुकूल आला तर पुढच्या एक-दोन महिन्यात सर्वसामान्यांसाठी ही लस उपलब्ध होऊ शकते. भारतात पुण्यातून या लस चाचणीची सुरुवात झाली
-
लस चाचणीसाठी नोंदणी केलेल्या पाच स्वयंसेवकांशी काल भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजकडून संपर्क साधण्यात आला.
-
त्यांना फिटनेस आणि अन्य चाचण्यांसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांची RT-PCR आणि अँटीबॉडी चाचणी करण्यात आली.
-
स्वयंसेवकांना करोनाची लागण होऊन गेलीय का ? याची तपासणी करणे, त्या मागचा उद्दशे होता. आज चाचणीच्या काही मिनिटे आधी त्यांचा अहवाल डॉक्टरांना मिळाला.
-
तीन पुरुष आणि दोन महिलांची तपासणी करण्यात आली. त्यात तिघांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे ते लस चाचणीसाठी अनफीट ठरले.
-
करोना व्हायरसची तुम्हाला बाधा होऊन गेलेली असते तेव्हा शरीरात अशा अँटीबॉडीज तयार होतात. दिल्ली, मुंबईतील सिरो सर्वेमध्ये अनेकांच्या शरीरात अशा अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
-
अँटीबॉडीज म्हणजेच करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी त्यांच्या शरीरात एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होणे. पुण्यात आज पाच जणांची चाचणी होणार होती. त्यात तिघांच्या शरीरात अशा अँटीबॉडीज आढळून आल्या.
-
भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजच्या चाचण्या होतील. आज पुण्यात लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांना २८ दिवसांची दुसरा डोस दिला जाईल.

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच