-
सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. (सर्व फोटो – रॉयटर्स)
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
"हिवाळ्यामध्ये करोनाचं संक्रमण वेगानं पसरण्याची शक्यता आहे. आम्ही याबाबत कोणतीही भविष्यवाणी करू इच्छित नाही. परंतु एक अशी वेळ येईल जेव्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या अधिक असेल आणि मृत्यूदरातही वाढ दिसेल," असं मत हंस क्लग यांनी व्यक्त केलं
-
युरोपमधील ५५ पैकी ३२ राज्य आणि क्षेत्रांमध्ये १४ दिवसांमध्ये एकूण प्रकरणांमध्ये १० टक्क्यांची वाढ झाल्याचं क्लझ यांनी सांगितलं.
-
आरोग्य सेवा फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत अधिक सतर्क आणि तयार असल्याचं क्लझ यांनी यावेळी नमूद केलं.
-
युरोपियन ऑथोरिटीनं नुकतंय विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा शिक्षण सुरू करण्याचा विचार केला आहे. तसंच त्यांचे पालकही कार्यालयात जाण्याचा विचार करत आहेत. फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेनसारख्या देशांमध्ये करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येदरम्यान कठोर नियम, अधिक शिक्षक आणि नव्या डेस्कच्या निर्मितीवर काम सुरू आहे.
-
दरम्यान, अमेरिकेत मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याच्या निर्णयाला राजकीय वळण मिळालं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल़् ट्रम्प यांनी शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर त्यांना अनेक टीकांना सामोरं जावं लागलं होतं.
-
गेल्या काही दिवसांमध्ये शाळांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव पसल्याची माहिती समोर आली होती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत शाळेत जाणं योग्य नसल्याचं म्हटलं जात होतं.
-
विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठवणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं मत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केलं. तसंच जे पालक आपल्या पाल्यांना घरीच ठेऊ इच्छितात त्यांच्यावर जॉन्सन यांनी टीका केली होती. तर कर्मचाऱ्यांना कार्यालयात आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी आपण काहीही करू असं मत फ्रान्सच्या पंतप्रधानांनीही व्यक्त केलं होतं.
-
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या अनेक देश लस विकसित करण्यावर दिवसरात्र काम करत आहे. यावर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला करोनावरील लस बाजारात येण्याचा दावा करण्यात येत आहे.

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच