-
भारतीय सैन्याने लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या १५९७ किलोमीटरच्या नियंत्रण रेषेवर सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या पोझिशन्समध्ये काही बदल केले आहेत.
-
चुशूल सेक्टरमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.
-
चीनच्या या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतीय सैन्याने आपल्या पोझिशन्समध्ये काही बदल केले असून पहिल्यापेक्षा स्थिती अधिक मजबूत केली आहे.
-
चीनने बळकावलेल्या अक्साई चीन भागात पीएलएच्या हवाई दलाच्या हालचाली सुद्धा वाढल्या आहेत.
-
"या भागातील चीनची आक्रमकता लक्षात घेऊन तसेच सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने भारतीय सैन्याच्या पोझिशन्समध्ये काही बदल केले आहेत" असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
-
लडाखमध्ये पीएलए सैनिक संख्या वाढवत असताना भारतीय लष्करानेही SFF सारख्या अतिरिक्त विशेष फोर्सेस आणून चीनच्या तोडीचे सैन्यबळ तैनात केले आहे.
-
१९६२ च्या युद्धानंतर चीनचा सामना करण्यासाठी या खास स्पेशल फ्रंटियर फोर्सची स्थापना करण्यात आली. याच SFF ने दोन दिवसांपूर्वी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या आहेत.
-
डेपसांग, चुमूरमध्ये भारताने आपल्या विशेष तुकडया तैनात करुन एक इंच जमीनही देणार नाही असा स्पष्ट संकेत चीनच्या पीएलएला दिला आहे.
-
डेमचॉक आणि चुमूर या भागात भारतीय सैन्य मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे वर्चस्व राखता येईल. ल्हासा-काशगर(२१९) महामार्ग थेट भारताच्या रेंजमध्ये आहे.
-
पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरील आणि रेझांग ला जवळच्या रेचीन ला येथील महत्त्वाच्या टेकडया भारताने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात