-
पाकिस्तानने अमेरिकन ब्लॉगर असणाऱ्या सिंथिया रिची यांना १५ दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. जून महिन्यामध्ये सिंथिया यांनी माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. तर माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी आपल्याशी गैरवर्तवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. (सर्व फोटो : facebook.com/cynthiadritchie/ वरुन साभार)
-
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने बुधावारी सिंथिया यांचा व्हिसा वाढवून देण्याचा अर्ज फेटाळून लावत त्यांना मायदेशी परतण्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत.
-
मंगळवारी सिंथिया यांच्या व्हिसाचा कालावधी वाढवून देण्यासंदर्भातील खटल्याची सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये सुरु झाली. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करावी असा आदेश दिला.
-
सिंथिया मागील ११ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये राहतात.
-
बेनझीर भुट्टो आणि त्यानंतर आलेल्या सरकारशी सिंथिया यांचे खूप चांगले संबंध होते असं सांगितलं जातं.
-
मी कोणत्या नियमांचे उल्लंघन केलं आहे हे तरी मला सांगा अशी प्रतिक्रिया सिंथिया यांनी व्हिसा वाढून न देण्यासंदर्भातील बातमी कळाल्यानंतर दिली आहे.
-
मला देशातून निघून जाण्यासंदर्भातील आदेश देणे हा पूर्णपणे दबावाखाली घेण्यात आलेला निर्णय आहे असं सिंथिया यांनी म्हटलं आहे.
-
माझ्याकडे वर्किंग व्हिसा आहे. मी या आदेशाविरोधात न्यायालयात जाणार आहे असंही सिंथिया यांनी स्पष्ट केलं आहे.
-
सन २०११ ते २०१४ च्या कालावधीमध्ये सिंथिया पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनामध्येच वास्तव्यास होत्या.
-
पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केल्या प्रकरण सिंथिया यांच्याविरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता.
-
या प्रकरणानंतरच पाकिस्तानमधील विरोधी पक्ष असणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने सिंथियांविरोधात मोहिम सुरु केली आहे.
-
बेनझीर भुत्तोंचा पक्ष असणाऱ्या पीपीपीने सिंथियांविरोधात भूमिका घेत पाकिस्तानमधून त्यांना हद्दपार करण्यात यावे यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
-
पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच बुधवारी संध्याकाळी आदेश जारी करत सिंथिया यांना १५ दिवसात देश सोडण्यास सांगितले.
-
पाकिस्तान सरकारने सिंथिया यांनी व्हिसा वाढवून देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे.
-
१० जुलै रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सिंथिया यांच्याविरोधात करण्यात येणारे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निरिक्षण नोंदवले होते.
-
सिंथिया यांच्याविरुद्धच्या खटल्यामध्ये पाकिस्तानमधील दोन्ही प्रमुख पक्ष म्हणजेच इम्रान खान सरकार आणि प्रमुख विरोधक पीपीपी एकत्र असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सिंथिया यांना अमेरिकेत परत पाठवण्याची मागणी केली आहे.
-
सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातील प्रमुख न्यायमूर्ती अथहर मिन्ल्लाह यांनी सिंथिया यांच्या याचिकेवर सुनावणी करताना, “व्हिसासंदर्भातील नियमांबद्दल सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे काही स्पष्टीकरण नाहीय हे पाहून हैराण व्हायला होतं,” असं म्हटलं होतं.
-
सिंथिया यांच्या व्हिसाप्रकरणाची गृह खात्याच्या सचिवांना माहिती नसल्याबद्दल न्यायलयाने नाराजी व्यक्त केली होती.
-
सिंथिया यांना व्हिसा का वाढवून देण्यात येत नाहीय याबद्दलचे कारण सरकारने न्यायालयासमोर स्पष्ट करावे असंही न्या. मिन्ल्लाह यांनी म्हटलं होतं. कनिष्ठ न्यायालयाने यासंदर्भात निर्णय द्यावा असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
-
जून महिन्यामध्ये सिंथिया यांनी ट्विटवर एक पत्रक जारी केलं होतं. त्या पत्रकामुळे पाकिस्तानच्या राजकारणामध्ये एकच खळबळ माजली होती.
-
सिंथिया यांनी माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा तर माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला होता.
-
सिंथिया यांचे पाकिस्तानमधील अनेक नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते.
-
काही जण सिंथिया या अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएसाठी काम करत असून त्या सीआयएच्या एजंट असल्याचे मानतात.
-
या आरोपांनंतर माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी १० जून रोजी सिंथिया यांना एक कायदेशीर नोटी पाठवली होती.
-
गिलानी यांनी सिंथिया यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये मानहानी केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी १० कोटी रुपये नुकसानभरपाई आणि जाहीर माफी मागण्याची मागणी गिलानी यांनी केली होती.
-
माजी गृहमंत्री असणाऱ्या रहमान मलिक यांनाही बलात्काराचा आरोप करणाऱ्या सिंथिया यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते.
-
जून महिन्यापर्यंत सिंथिया या पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोशल मिडिया टीममध्ये काम करायच्या.
-
या टीममधून सिंथिया यांना काढून टाकल्याचे अधिकृत आदेश सरकारने जारी केलेले नाहीत.
-
इम्रान खान आणि सिंथिया हे एकमेकांना २००९ पासून ओळखत असल्याचे सांगितले जाते.
-
२००९ साली आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांसाठी सिंथिया या इम्रान खान यांचे समर्थन करणारे लेख लिहायच्या.

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच