-
अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे.
-
हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून 'कोव्हॅक्सीन' या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. (Photo: Reuters)
-
देशात एकाबाजूला दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत असताना या कोव्हॅक्सनी लशीचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट समोर आला आहे. (Photo: AP)
-
करोना व्हायरसमुळे जगणं मुश्किल झालेल्या या काळात कोव्हॅक्सीन लशीचा प्राण्यांवरील पहिल्या फेजच्या चाचणीचा रिपोर्ट खूपच उत्साहवर्धक आहे.
-
कुठल्याही लशीच्या निर्मितीला काही वर्ष लागतात. पण सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत काही महिन्यात यशस्वी लस निर्मितीचे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे. (Photo: Reuters)
-
त्यामुळे नेहमीपेक्षा अत्यंत वेगाने जगभरात करोना विरोधात लस संशोधन सुरु आहे. लशीची मानवी चाचणी करण्याआधी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राण्यांवर चाचणी केली जाते. त्याला प्री-क्लिनिकल चाचणी म्हणतात.
-
कोव्हॅक्सीन प्राण्यांवरील चाचणीत प्रभावी ठरली आहे. एकूण २० माकडांना प्रत्येकी पाच याप्रमाणे चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांना लशीचे दोन डोस देण्यात आले.
-
माकडांच्या एका गटाला प्लासीबो देण्यात आला. तीन अन्य गटांना तीन वेगवेगळया प्रकारचा लशीचा पहिला डोस दिला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसरा डोस दिला.
-
१४ दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर सर्व माकडं व्हायसरच्या संपर्कात आली. त्यानंतरच्या अभ्यासात लशीमुळे माकडांचे व्हायरसपासून संरक्षण झाल्याचे समोर आले.
-
माकडांच्या शरीरात व्हायरसचा खात्मा करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या तसेच नाक, गळा आणि फुफ्फुसांमध्ये व्हायरसचा गुणाकार थांबला.
-
लस दिलेल्या माकडांच्या हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीत न्यूमोनियाचे कुठलेही लक्षण आढळले नाही.
-
लशीचे दोन डोस दिलेल्या प्राण्यांमध्ये कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे.
-
कोव्हॅक्सीनचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट जाहीर करताना अभिमान वाटत असल्याचे भारत बायोटेकने टि्वटमध्ये म्हटले आहे.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?