-
नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून शुक्रवारी ते मुंबईसाठी रवाना झाले. असंख्य नागपुरकर तुकाराम मुंढे यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जमले होते.
-
नागपूरकर हातामध्ये पोस्टर घेऊन घोषणा देत तुकाराम मुढेंना समर्थन दर्शवत होते. तर अनेकांनी त्यांच्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले.
-
दरम्यान, शनिवारी मुंबईत आलेल्या तुकाराम मुंढे यांनी एक भावूक फेसबुकपोस्ट शेअर करत नागपुरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
-
काल नागपूरकरांचा निरोप घेताना मन सुन्न झालं होतं, असं मुंढे म्हणाले.
-
लोकांनी माझ्यातला कठोर अधिकारी अनुभवला आहे. मात्र त्या अधिकाऱ्यातला भावुक अधिकारी आज नागपूरकरांनी अनुभवल्याचं विश्लेषण माध्यमांनी केलं.
-
आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो. नागपुरातून निघताना हृदय जड झालं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
-
त्याला कारणही तसंच होतं. माझ्या नोकरीच्या कार्यकाळात मला थांबविण्यासाठी नागरिकांनी चक्क बंगल्याच्या दारावर चार-चार तास ठिय्या देतात, यातच सारे सामावले आहे.
-
नागरिकांच्या भावनांचा मी आदर करतो. मात्र, मी केवळ एक निमित्त होतो. मी अधिकारी असल्याने माझी बदली ही ठरलेलीच आहे.
-
त्यामुळे नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य, जबाबदारी ओळखायला हवी. आपण दाखविलेले प्रेम अपूर्व आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.
-
या प्रेमाची आणि आपण दाखविलेल्या विश्वासाची उतराई करणे मला तरी शक्य नाही.
-
मी सदैव आपल्या प्रेमाच्या ऋणात राहू इच्छितो. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद असं तुकाराम मुंढे म्हणाले.
-
सर्वांच्या या प्रेमासाठी केवळ THANK YOU हे पुरेसं नाही, असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून त्यांना निरोप देताना 'We Want Mundhe Sir' तसंच 'आगे आगे मुंडे पीछे पड गये गुंडे' अशा घोषणा दिल्या.
-
जमलेल्या लोकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
-
तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु १५ दिवसांत त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते कोणत्या पदावर रूजू होणार याबाबत माहिती समोर आली नाही.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?