-
देशातील तीन करोना प्रतिबंधक लसींपैकी सीरम इन्स्टिटय़ूटच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी परवानगीनंतर लवकरच सुरू केली जाणार असल्याचं मंगळवारी लोकसभेत सांगण्यात आलं होतं.
-
त्यानंतर मंगळवारीच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) ऑक्सफर्डच्या करोना लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
-
डीजीसीआयनं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्याचे आपले आदेश रद्द केले आहेत. असं असलं तर चाचणीदरम्यान अतिरिक्त लक्ष देण्यासह काही अन्य अटीही डीजीसीएनं ठेवल्या आहेत.
-
डीजीसीआयनं सीरम इन्स्टिट्यूटला विपरीत परिस्थितींचा सामना करण्याच्या नियमांतर्गत ठरवण्यात आलेल्या उपचारांची माहिती देण्यासही सांगितलं आहे.
-
यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी डीजीसीआयनं सीरमच्या करोना लसीची चाचणी थांबवण्याचे आदेश दिले होते. ऑक्सफर्ड-अॅक्स्ट्रा झेनिका ही लस दिल्यानंतर एका स्वयंसेवकाची तब्येत खराब झाल्यीच माहिती समोर आली होती. त्यानंतर भारतातही ही चाचणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते.
-
करोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतलं जाऊ नये असं डीसीजीआयने आदेशात सांगितलं होतं.
-
यापूर्वी कॅडिला हेल्थकेअर आणि भारत बायोटेक कंपन्यांच्या लसींच्या चाचणींचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
-
आयसीएमआर आणि सीरम इन्स्टिटय़ूट दोन लसींवर संशोधन करत आहेत. ऑक्सफर्ड-एक्स्ट्रा झेनिका लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू होईल. तसेच, अमेरिकेतील कंपनीची नोव्हाव्हॅक्स या लसीची चाचणीही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.
-
देशी बनावटीच्या दोन्ही लसींच्या चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक निष्कर्ष आल्याचेही चौबे यांनी सांगितले.
-
भारतात ‘कोव्हीशिल्ड’ नावाने सीरम इन्स्टिटय़ूटकडून लस उत्पादित केली जात होती. यासाठी त्यांनी चाचण्याही सुरु केल्या होत्या.
-
डीसीजीआयने सीसीरम इन्स्टि्यूटला चाचणीदरम्यान लस देण्यात आलेल्यांच्या सुरक्षेची सर्व उपाययोजना करण्याचं तसंत सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासही सांगितलं होतं.
-
प्रातिनिधीक छायाचित्र
-
सीरम इन्स्टि्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनीदेखील तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवत असल्याची माहिती दिली होती.
-
त्याअंतर्गत १०० स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली असून त्याबाबतच्या निरीक्षणांवर आधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले होते.
-
“आम्ही डीजीसीआयच्या नियमांचं पालन करत आहोत. आम्हाला चाचणी थांबवण्यास सांगण्यात आलं नव्हतं. जर सुरक्षेबाबत डीजीसीआयला कोणतीही चिंता असेल तर आम्ही त्यांच्या आदेशांचं आणि प्रोटोकॉलचं पालन करू,” असं सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलं होतं.
-
ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लसीच्या उत्पादनाबाबत सीरम इन्स्टिटय़ूटची अॅस्ट्राझेन्काशी (ब्रिटिश-स्वीडीश कंपनी) भागीदारी आहे.
-
मानवी चाचणीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचे आढळल्यानंतर अॅस्ट्राझेन्काने लसीच्या चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला.
-
या लसीमुळे काय दुष्परिणाम झाले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, लसीची सुरक्षितता पडताळण्यासाठी तूर्त चाचण्या थांबविण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केलं होतं.
-
मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यात येत असताना एखाद्या व्यक्तीवर दुष्परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याची स्वतंत्र समितीद्वारे तपासणी करून सुरक्षेबाबतची खातरजमा करून घेण्यासाठी चाचण्या थांबविण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं.
-
चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांची सुरक्षा आणि लशीच्या उच्च दर्जाबाबत कटिबद्ध असल्याचे अॅस्ट्राझेन्काच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?