-
एनडीएमधील शिरोमणी अकाली दलाच्या कोट्यातून मंत्री असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकावरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. हरसिमरत कौर या पंजाबमधीस भटिंडा येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. २००९ पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती.
-
हरसिमरत कौर यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल याचा मुलगा सुखबीर बादल यांच्याशी विवाह केला आहे.
-
हरसिमरत कौर आणि सुखबीर बादल यांची तीन मुलं आहेत.
-
हरकीत कौर आणि गुरलीन कौर अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.
-
त्यांच्या मुलाचं नाव अनंत बीर सिंह बादल असं आहे.
-
हरसिमरत कौर या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. तसंच त्या आपल्या कुटुंबीयांसोबत सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.
-
यामध्ये हरसिमरत कौर यांच्यासोबत त्यांचे पती सुखबीर सिंह, प्रकाश सिंह बादल आणि गुरदास सिंह बादल हे दिसत आहेत.
-
आपले काका गुरदास सिंह बादल यांच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणून हरसिमरत कौर यांनी हा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
-
या फोटोमध्ये त्या आपले वडिल सत्यजित सिंह मजीठिया यांच्यासोबत आहेत. नेहरूंच्या काळात त्यांनी सरकारमध्ये उपसंरक्षणंत्री हे पद भूषवलं आहे.
-
आपले बंधू विक्रम मजीठिया यांच्यासह रक्षाबंधनाच्या वेळी हरसिमरत कौर.
-
हरसिमरत कौर या राजकारणासोबतच आपल्या कुटुंबीयांनाही अधिक वेळ देताना दिसतात.
-
(सर्व फोटो – हरसिमरत कौर, इन्स्टाग्राम)

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?