-
मुंबई महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या परेलच्या केईएम रुग्णालयात आजपासून ऑक्सफर्डने विद्यापीठातील जेन्नर इन्स्टिटयूटने विकसित केलेल्या करोना लशीच्या फेज दोन आणि तीनच्या चाचण्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे.
-
ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या करण्यासाठी केईएमच्या एथिक्स समितीकडून मंगळवारी परवानगी मिळाली.
-
चाचणीसाठी स्वयंसेवकांची तपासणी सुरु केली आहे. केईएममध्ये १०० स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येईल असे डीन डॉ.हेमंत देशमुख यांनी सांगितले. (Photo: AP)
-
शहरातील महापालिकेचे दुसरे हॉस्पिटल बी.वाय.एल. नायर हॉस्पिटललाही कोविशिल्ड लशीच्या चाचणीची परवानगी मिळाली. सिरम इन्स्टिटयूटकडून उत्पादन करण्यात येणाऱ्या या लशीचे भारतातील नाव 'कोविशल्ड' आहे. (Photo: Reuters)
-
देशातील एकूण १७ आणि राज्यातील आठ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हिशिल्ड लसीची चाचणी होणार आहे. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्देश आहे. (Photo: Reuters)
-
केईएम आणि नायर रुग्णालयात मिळून २०० स्वयंसेवकांवर ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-
लस टोचून घेण्यासाठी शहरातील जवळपास चारशे स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. लस टोचण्यासाठी निर्देशित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसेवकांची निवड पहिल्या टप्प्यात केली जाईल.
-
करोनाची लागण झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी आरटीपीसीआर, प्रतिपिंड (अँटिबॉडी) या चाचण्या केल्या जातील. यातून १०० स्वयंसेवकांची निवड केली जाईल. लवकरच या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
-
करोना व्हायरसला रोखण्यासाठी ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीच्या मानवी चाचणीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेकांनी मोठा उत्साह दाखवला होता.
-
सुरूवातीच्या टप्प्यात करोनाचा प्रसार जगभरात झाल्यानंतर दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याच्या केस कुठेही दिसून आल्या नव्हत्या. मात्र, आता हळूहळू जगभरात दुसऱ्यांदा करोना होत असल्याची प्रकरणं आढळून येऊ लागली आहे.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?