-
देशाचे पंतप्रधान आणि सध्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा अशी ओळख असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना आज सक्रीय राजकारणामध्ये १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपाने आज त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन काही फोटो पोस्ट करत मोदींनी या कालावधीमध्ये घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांबद्दल आणि घडामोडींचा धावता आढावा घेतला आहे. सन २००१ ते २०२० दरम्यान मोदींनी केलेल्या २० महत्वाच्या कामांची माहिती भाजपा दिली आहे. याच २० कामांवर टाकलेली नजर… (फोटो: पीटीआय)
-
सन २००१ > १९ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००२ > गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने विक्रमी कामगिरी केली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००३ > व्हायब्रंट गुजरात या गुंतवणुकदारांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं. यामध्ये ७६ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००४ > गुजरातमधील मुलींसाठी कन्या केळवणी आणि शाळा प्रवेशोत्सवसारख्या योजना राज्य सरकारने सुरु केल्या. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००५ > बेटी बचाओ मोहिमेची सुरुवात केली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००६ > गुजरातमधील जनतेसाठी ज्योतिग्राम योजना सुरु केली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००७ > मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. सर्वाधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहण्याचा विक्रम मोदींच्या नावे झाला. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००८ > टाटा उद्योग समुहाचा महत्वकांशी प्रकल्प असणाऱ्या नॅनोच्या उत्पादनाला गुजरातमध्ये सुरुवात झाली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २००९ > ई-ग्राम, विश्व-ग्राम योजनांच्या माध्यमातून राज्यातील गावं इंटरनेटने जोडली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१० > गुजरातच्या इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी टाइम कॅप्सूल प्रकल्प राबवला. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०११ > सद्भावना मिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१२ > २६ सप्टेंबर रोजी मोदी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१३ > १३ सप्टेंबर रोजी झालेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींची निवड करण्यात आली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१४ > २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१५ > २१ जून रोजी जगभरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१६ > नोटबंदी, डिजिटल माध्यमातून व्यवहारांना चालना देण्यासाठीचे निर्णय घेण्यात आले. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१७ > एक देश एक कर धोरणाअंतर्गत देशभरामध्ये जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१८ > स्टेच्यू ऑफ यूनिटीचे उद्घाटन (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०१९ > मोठ्या बहुमतासहीत मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)
-
सन २०२० > योग्यवेळी लॉकडाउन करुन करोना संसर्ग रोखण्यात यश मिळवलं. (फोटो: twitter/BJP4India वरुन साभार)

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?