-
पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या इस्लामाबाद शहरामध्ये संसदेबाहेर मंगळवारी जोरदार निर्दर्शने करण्यात आली. सरकारने बेरोजगारांना रोजगार द्यावा अशी आंदोलकांची मागणी होती. तसेच सरकारने तात्पुरत्या स्वरुपात कामाला असणाऱ्यांना कायमस्वरुपी कामावर ठेवावे आणि वेतनवाढ द्यावी अशी मागणी करणारे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. (सर्व फोटो असोसिएट प्रेसच्या (AP) सौजन्याने)
-
आंदोलकांनी आपल्या हातामध्ये बॅनर्स आणि पोस्टर्सही घेतले होते. यावर पंतप्रधानांनी आपल्या जनतेला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, रोजगार काढून घेण्याचं नाही, असा मजकूर या बॅनर आणि पोस्टरवर लिहिण्यात आला होता. आंदोलक जोरजोरात घोषणाबाजीही करत होते.
-
पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
-
बेरोजगारीबरोबरच दिवसोंदिवस पाकिस्तानमधील महागाईही वाढत आहे त्यामुळेच जनतेने आता थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
-
पाकिस्तानमध्ये सध्या ४० किलो गहू २४०० रुपयांना मिळतात. तर भाज्यांचे दरही कडाडलेले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानमधील ग्राहक मुल्यांक (Consumer Price Index) ९ टक्के इतका आहे.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?